कैद्यांचे वेतन वाढले! लॉकडाउनमध्ये मिळवून दिला मोठा महसूल; स्वतःचीही चांगली कमाई

4nashik_20jail.jpg
4nashik_20jail.jpg

नाशिक : नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, मूर्ती, वीणकाम, बेकरी, रसायन आदी नऊ कारखाने आहेत. त्यातून दरवर्षी सहा कोटींवर महसूल मिळतो. फक्त शिक्षा झालेल्या कैद्यांनाच काम देता येते. त्यांना २० सप्टेंबरपासून वेतनवाढ लागू झाली आहे.

म्हणून शक्य झाले

देशातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाची लागण झाली. मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात दीडशेवर कैद्यांना कोरोना झाला. मात्र, नाशिकरोड कारागृहात एकही कैदी अथवा कर्मचाऱ्याला कोरोना झालेला नाही. याचे प्रमुख कारण आरोग्यविषयक उपाययोजना तर आहेतच, परंतु कैद्यांना नियमित रोजगार पुरवून त्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यात आलेले यश हेदेखील आहे. अन्य कारागृहांत लॉकडाउनमुळे कच्चा माल न पोहोचल्याने त्यांचे कारखाने ठप्प होते. नाशिकरोड कारागृहाने योग्य नियोजन केल्याने येथील नऊ कारखाने सुरूच राहिले. त्यामुळे कैद्यांना चांगले वेतन, सरकारला महसूल, तर ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळाल्या.

कारागृहाला मिळाले पंधरा ते वीस लाख

नाशिकरोड कारागृहातील तीस कैद्यांनी लॉकडाउनमध्ये कॉटनचे किंमत १५ ते २० रुपये प्रति, एक लाख री-युजेबल मास्क तयार केले. जिल्हा रुग्णालय व संदर्भ रुग्णालय, महाराष्ट्र बँक, बडोदा बँक, राज्यातील सर्व कारागृहे, नाशिकरोड प्रेस, गणेश कंपनी, रेल्वे सुरक्षा बल, स्वयंसेवी संस्था, हौसिंग सोसायट्या आदींनी हजारो मास्क घेतले. त्यातून कारागृहाला पंधरा ते वीस लाख, तर यंदा गणेशमूर्ती विक्रीतून सव्वासात लाख रुपये मिळाले. कारागृहाने २०१८ मध्ये रेल्वेला ८० हजार कागदी पिशव्या तयार करून दिल्या.

२० सप्टेंबरपासून वेतनवाढ लागू 

नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, मूर्ती, वीणकाम, बेकरी, रसायन आदी नऊ कारखाने आहेत. त्यातून दरवर्षी सहा कोटींवर महसूल मिळतो. फक्त शिक्षा झालेल्या कैद्यांनाच काम देता येते. त्यांना २० सप्टेंबरपासून वेतनवाढ लागू झाली आहे. कुशल कैद्यांना दिवसाला ६१ रुपये वेतन होते. ते आता ६७ रुपये झाले आहे. अर्धकुशल कैद्यांचे वेतन ५५ वरून ६१, तर अकुशल कैद्यांचे वेतन ४४ वरून ४९ रुपयांवर झाले आहे. हे वेतन कैदी घरी पाठवू शकतो, वकिलाची फी, कँटीनचा खर्च देऊ शकतो. काही रक्कम सुटकेच्या वेळी दिली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com