विनापरवाना गर्भपाताच्या गोळ्यांची अवैधरीत्या विक्री; पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

विनापरवाना व विना खरेदी बिल गर्भपातासाठी वापरावयाचा सुमारे ९० हजाराचा औषध साठा औषध प्रशासनाने छापा मारी करत जप्त करुन मालेगाव येथील आझाद नगर पोलिस ठाण्यात संबंधिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सातपूर (नाशिक) : विनापरवाना व विना खरेदी बिल गर्भपातासाठी वापरावयाचा सुमारे ९० हजाराचा औषध साठा औषध प्रशासनाने छापा मारी करत जप्त करुन मालेगाव येथील आझाद नगर पोलिस ठाण्यात संबंधिता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

एकूण १५० किट्स साठा जप्त

नाशिक कार्यालयातील औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवार (ता. २४) मालेगावच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विना परवाना व विना खरेदी बिल गर्भपातासाठी वापरावयाचा औषध साठा {Clean-Kit (Combikit of Mifepristone & Misoprostol Tabs)} एकूण १५० किट्स साठा जप्त केला. औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकार यांनी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत कलम आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आबीद आमीन यास अटक करण्यात आली आहे. सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड करीत आहेत. 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sale of unlicensed abortion pills Filed a crime nashik marathi news