esakal | धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

water drum 123.png

ऑटो गॅरेज व कोल्ड्रींक्सच्या दुकानात तर मोबाईल शॉपीच्या दुकानात बेकायदेशीररित्या प्रकार सुरू होता. पोलीसांना याची खबर मिळाली. त्यानंतर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या पथकाने जेव्हा तपासले तेव्हा तिथे जे काही आढळले ते धक्कादायक होते.

धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : ऑटो गॅरेज व कोल्ड्रींक्सच्या दुकानात तर मोबाईल शॉपीच्या दुकानात बेकायदेशीररित्या प्रकार सुरू होता. पोलीसांना याची खबर मिळाली. त्यानंतर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या पथकाने जेव्हा तपासले तेव्हा तिथे जे काही आढळले ते धक्कादायक होते.

कोल्ड्रींक्स व मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू होता प्रकार..

पिंपळगाव (ता. मालेगाव) येथील गंगासागर ऑटो गॅरेज व कोल्ड्रींक्सच्या दुकानात विनापरवाना पेट्राेल तर गंगाई मोबाईल शॉपीच्या दुकानात बेकायदा देशी, विदेशी दारु विक्रीचा प्रकार अपर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून उघडकीस आणला. या पथकाने निळ्या रंगाच्या ड्रममधून 2 हजार 640 रुपये किंमतीचे 30 लिटर पेट्रोल तर देशी-विदेशी दारुच्या सहा बाटल्या, दुचाकी, दोन मोबाईल असा सुमारे चाळीस हजार 634 रुपयाचा ऐवज जप्त केला. गंगासागर गॅरेजचे सुनील पवार हे अवैधरित्या पेट्रोल तर मोबाईल शॉपी दुकानाचा मालक योगेश पवार हा देशी-विदेशी दारुच्या बाटल्या विक्री करताना मिळून आला. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पोलिस शिपाई तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते आदींनी सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. दोघांविरुध्द वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!