वाळू चोरीवर आता ड्रोनद्वारे नजर; राज्यात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात कार्यान्वित 

विनोद बेदरकर
Thursday, 8 October 2020

अवैध उत्खननावर तसेच अवैध वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य शासनाने शौर्य इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरातून वाळू वाहातूकीवर करडी नजर ठेवणार आहे. या प्रणालीचा राज्यात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात वापर होणार आहे. 
अवैध उत्खननावर तसेच अवैध वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य शासनाने शौर्य इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

या ड्रोन प्रणालीची सुरुवात सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे दगड- खदानीचे छायाचित्रीकरण करून त्या खदानीची सीमा पडताळणी व भू संदर्भ निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. खाणीच्या कामकाजाचे विश्लेषण करण्यासाठी नियमित अंतराने हवाई सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यास मदत होणार आहे. 

राज्यात सर्वप्रथम वाळूवर नजर ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ड्रोनचा वापर होणार आहे. अद्यावत तंत्रज्ञानामुळे वाळू चोरीला आळा बसून महसुल वाढणार आहे. 
- सूरज मांढरे (जिल्हाधिकारी नाशिक)  

 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand theft will be monitored with the help of drones nashik marathi news