दिवस-रात्र ड्युटीवर असलेल्या पोलीसांचे 'सॅनिटायझेशन' होणार आता शक्य..कारण..

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 12 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संचारबंदीमुळे रस्त्यावर उतरलेल्या या हजारो पोलिसांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी सतत रस्त्यावर नाकाबंदी, गस्त घालत असून, घराबाहेर पडणाऱ्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका संभवतो. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने पोलिसांना मास्क, सॅनिटायझर पुरविले असून, नागरिकांपासून सुरक्षित अंतर राखून संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. 

नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे. संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशामुळे पोलिस यंत्रणा दिवस-रात्र रस्त्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न उभा राहिल्याने शहर व ग्रामीण पोलिस दलाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली असून, या व्हॅनमार्फत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोशाखाचे निर्जंतुकीकरण करून त्यांच्या घरी जाता येणे शक्‍य होणार आहे. 

पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझेशन व्हॅन 
पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शनिवारी (ता.11) या सॅनिटायझेशन पोलिस व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. शहर पोलिस आयुक्तालयात सुमारे दोन हजार 800, तर जिल्हा ग्रामीण पोलिसात सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. संचारबंदीमुळे रस्त्यावर उतरलेल्या या हजारो पोलिसांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी सतत रस्त्यावर नाकाबंदी, गस्त घालत असून, घराबाहेर पडणाऱ्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका संभवतो. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने पोलिसांना मास्क, सॅनिटायझर पुरविले असून, नागरिकांपासून सुरक्षित अंतर राखून संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव : आयुक्तालयात दोन, ग्रामीण पोलिसांत चार व्हॅन 
तसेच, शहर व ग्रामीण पोलिस दलाने सॅनिटायझेशन व्हॅनही तयार केल्या आहेत. त्यानुसार या व्हॅन पोलिस ठाणेनिहाय फिरणार असून, व्हॅनमध्ये सोडियम हायपोक्‍लोराईड, सोप सोल्यूशन आणि पाणी यांचा फवारा करून सॅनिटायझेशन केले जात आहेत. तसेच शहर पोलिस दलास महिंद्र ऍन्ड महिंद्रनेही एक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार परिवहन विभागातील पोलिस निरीक्षक दिलीप चोपडे व त्यांच्या पथकाने ही व्हॅन बनविली आहे. शहरातील प्रत्येक नाकाबंदी, पोलिस ठाणे येथे जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यानंतरच पोलिस त्यांच्या घरी जातील. यामुळे ते स्वत: व कुटुंबीयांचा कोरोनापासून बचाव करू शकतील, असा व्हॅनमागील उद्देश असल्याचे पोलिस मुख्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

हेही वाचा >VIDEO : निदान 'या' नऊ महिन्याच्या चिमुरडीचं तरी ऐका...'ती' काय म्हणतेय एकदा तरी बघाच​
अधिकारी- कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंक्‍स 
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 16 हजार मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आले. चार सॅनिटायझर व्हॅन उपलब्ध आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर इन्फ्रारेड थर्मोमीटर तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय बंदोबस्तावरील पोलिसांची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी त्यांना एनर्जी ड्रिंक्‍सही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitation van for police protection from corona virus nashik marathi news