esakal | VIDEO : "माझा फोन टॅप केला असेल.. तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो" - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut 5.jpg

 गेल्या पाच वर्षांत सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याची भावना भाजपच्या पोटात गेल्याने वेडेवाकडे उद्योग झाले. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन पडद्यामागे वेगळेच उद्योग सरकारने केले. पक्षात व राजकारणात विरोधक ठेवायचाच नाही, अशा टोळी पद्धतीने सरकारी यंत्रणा वापरून राज्य चालविले.

VIDEO : "माझा फोन टॅप केला असेल.. तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो" - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात शनिवारी (ता. 25) झालेल्या "आमने-सामने' या मुलाखतीवेळी खासदार राऊत बोलत होते. राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राऊत यांना फोन टॅपिंग प्रकरणावर प्रश्न विचारले असता खासदार राऊत म्हणाले, माझा फोन टॅप केला असेल तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो तसेच "आमचं टॅपिंग ऐकून त्यांचा कॉन्फिडन्स गेला" असा टोला भाजपला यानिमित्ताने लगावला. 

"माझं काय वाकडं करणार,मी फटका माणूस" - राऊत

 गेल्या पाच वर्षांत सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याची भावना भाजपच्या पोटात गेल्याने वेडेवाकडे उद्योग झाले. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन पडद्यामागे वेगळेच उद्योग सरकारने केले. पक्षात व राजकारणात विरोधक ठेवायचाच नाही, अशा टोळी पद्धतीने सरकारी यंत्रणा वापरून राज्य चालविले. मंत्रालय लोकांसाठी असते, षडयंत्र करण्याचा अड्डा नाही. विरोधक संपविण्याची देशाची परंपरा नाही. हा संताप लोकांमध्ये होता. त्यामुळे फडणवीस यांना विरोधी पक्षनेते बनवून काळाने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे. या झुंडशाहीचे परिणाम आणखी पुढे दिसतील. 
 

"कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत

हेही वाचा > अमित ठाकरे यांचे खरे 'लॉंचिंग' नाशिकमध्येच!