सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त निवडीत स्थानिकांना डावलले; ग्रामस्थ आक्रमक 

दिगंबर पाटोळे
Thursday, 1 October 2020

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या १ आक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी पाच विश्वस्तांची निवड प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी जाहीर केली.

नाशिक/वणी : स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावरील सप्तशृंगीमाता मंदिर देवस्थानचा कारभार बघणाऱ्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या नवीन विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीत स्थानिकांना स्थान न दिल्याने सप्तशृंगगडवासीयांनी निवड प्रक्रियेविषयी सतंप्त भावना व्यक्त करीत निषेध केला आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्याचा निर्णय ग्रामस्थांनी बुधवारी (ता. ३०) बैठकीत घेतला आहे. 

श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या १ आक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी पाच विश्वस्तांची निवड प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी जाहीर केली. मात्र, या निवडीत सप्तशृंगीगड ग्रामपंचायत व स्थानिकांची मागणी असूनही विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टची स्थापना झाल्यापासून (१९७५) ते २००५ पर्यंत संस्थानच्या विश्वस्त मंडळात सप्तशृंगगडावरील स्थानिकांना स्थान देण्यात येत होते. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून विश्वस्त मंडळात स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने आम्ही या पदासाठी लायक नाही का, तसेच संस्थानचे मंदिर व मध्यवर्ती कार्यालय सप्तशृंगगडावर असतानाही स्थानिक विश्वस्त का नाही, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saptashrungi Board of Trustees does not include locals nashik marathi news