esakal | गुन्हे शाखेचा अधिकारी सांगून वृध्दासोबत केला धक्कादायक प्रकार!
sakal

बोलून बातमी शोधा

old man frausted.jpg

दुपारी एकच्या सुमारास वृध्द श्रीराम चौकात उभे होते. दुचाकीवरून एक व्यक्‍ती त्यांच्याजवळ आली व त्याने, मी गुन्हे शाखेचा अधिकारी असून, तुकाराम शिंदे या बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्‍तीची चौकशी करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी समोरून अजून दुसरा युवक येत असताना त्याला त्याने हटकले  त्यानंतर मात्र...

गुन्हे शाखेचा अधिकारी सांगून वृध्दासोबत केला धक्कादायक प्रकार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इंदिरानगर : दुपारी एकच्या सुमारास वृध्द श्रीराम चौकात उभे होते. दुचाकीवरून एक व्यक्‍ती त्यांच्याजवळ आली व त्याने, मी गुन्हे शाखेचा अधिकारी असून, तुकाराम शिंदे या बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्‍तीची चौकशी करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी समोरून अजून दुसरा युवक येत असताना त्याला त्याने हटकले  त्यानंतर मात्र...

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडे दुपारी एकच्या सुमारास त्यांचे मित्र यशवंत भोसले यांना भेटण्यासाठी श्रीराम चौकात उभे होते. दुचाकीवरून एक व्यक्‍ती त्यांच्याजवळ आली व त्याने, मी गुन्हे शाखेचा अधिकारी असून, तुकाराम शिंदे या बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्‍तीची चौकशी करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी समोरून अजून दुसरा युवक येत असताना त्याला त्याने हटकले आणि बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली. त्याने बॅग दाखविली. दरम्यान श्री. कुडे यांच्याशी बोलताना त्याने सांगितले, की तुम्हीसुद्धा पैसे, गळ्यातील सोने वगैरे एका रुमालात व्यवस्थित ठेवा. त्यावेळी रुमाल नसल्याचे कुडे यांनी सांगितल्यावर त्याने स्वतःच्या रुमालात त्यांची तीन तोळ्यांची चेन आणि 12 ग्रॅमची अंगठी, मोबाईल आणि काही रोख रक्कम असा ऐवज ठेवला आणि बांधून तो त्यांच्याकडे परत केला. श्री कुडे यांना शंका आल्याने त्यांनी रुमाल उघडला असता, त्यातील सोन्याची चेन आणि अंगठी असा एक लाख 20 हजारांचा ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद नोंदविली आहे.  

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

वृद्धाचा सव्वा लाखांचा ऐवज लुटला 

गुन्हे शाखेचा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत राजीवनगरात रविवारी (ता. 31) अनंत कुडे (वय 60, रा. कानिफनाथ चौक) यांचा सुमारे सव्वा लाखांचा सोन्याचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. 

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'