पाण्याच्या अचूक मोजमापासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर स्काडा प्रणाली; आयुक्तांच्या सूचना

विक्रांत मते
Sunday, 27 September 2020

त्यामुळे घंटागाडीच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणदेखील तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यासाठी रिसायक्लेबल मटेरियलचा पुनर्वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. कचरा प्रकल्पात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.  

नाशिक : पाण्याचे अचूक मोजमाप करणारे स्काडा, ॲटोमेशन तंत्रज्ञान महापालिकेने विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बसविताना त्याच धर्तीवर शहरातील अन्य जलशुद्धीकरण केंद्रावरही याच तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्रे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जाणार आहेत. लोकसंख्येनुसार खत प्रकल्पात वाढणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. 

खत प्रकल्पावरही नियोजन 

विल्होळी येथील महापालिकेच्या खत व जलशुद्धीकरण प्रकल्पाला श्री. जाधव यांनी भेट दिली. मुकणे धरणातून नाशिकसाठी १८ किलोमीटरच्या थेट पाइपलाइनमधून पाणीपुरवठा केला जातो. दीड वर्षांपूर्वी उदघाटनाची वाट न पाहता शहराची गरज ओळखून मुकणे धरणातून शहराला पाणीपुरवठा होऊ लागला. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करून इंदिरानगर, सिडकोचा काही भाग, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोचविले जाते. या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा इंदिरानगर भागाला झाला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पात स्काडा प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या यंत्राच्या सहाय्याने पाण्याचे अचूक मोजमाप होते. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राप्रमाणेच शहरातील सर्वच केंद्रांवर स्काडा तंत्राचा वापर करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, बाजीराव माळी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

स्वच्छ भारत अभियानाची तयारी 

गेल्या वर्षीच्या स्वच्छ भारत अभियानात नाशिक देशात अकरावे, तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होते. देशपातळीवर पहिल्या दहा शहरांच्या यादीत येण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कचरा डेपो व खतप्रकल्पाला भेट दिली. शहराची लोकसंख्या दर वर्षी वाढत आहे. त्यामुळे घंटागाडीच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणदेखील तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यासाठी रिसायक्लेबल मटेरियलचा पुनर्वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. कचरा प्रकल्पात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.  

हेही वाचा >  भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SCADA system at water treatment plants for accurate measurement of water nashik marathi news