स्वयंसेवी संस्थांना केंद्राची अल्पदरात अन्नधान्याची योजना राज्यात लागू - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 12 April 2020

भुजबळ म्हणाले, की स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना 21 रुपये प्रतिकिलो गहू व 22 रुपये प्रतिकिलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येईल. गहू व तांदळाची मागणी एकावेळी किमान एक टन आणि अधिक दहा टनापर्यंत असावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचा अर्ज करावा. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येईल.

नाशिक : कोरोनाच्या संकटामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्न-नागरी पुरवठा विभागातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जातात. स्वयंसेवी संस्था राज्यात अन्नधान्य वाटप करत असून, अन्नछत्र चालवत आहेत. अशा संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे, यासाठी केंद्राची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

छगन भुजबळ : लॉकडाउनमध्ये अन्नधान्य वितरण अन्‌ अन्नछत्र चालवणे 
भुजबळ आणि केंद्रीय अन्न- नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात शनिवारी (ता. 11) दूरध्वनीद्वारे राज्यातील जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत संवाद झाला. त्यावेळी स्वयंसेवी संस्थांसाठी केंद्र सरकारची योजना राज्यात लागू करण्याबाबत चर्चा झाली. भुजबळ म्हणाले, की स्वयंसेवी संस्थांच्या मागणीनुसार अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना 21 रुपये प्रतिकिलो गहू व 22 रुपये प्रतिकिलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात येईल. गहू व तांदळाची मागणी एकावेळी किमान एक टन आणि अधिक दहा टनापर्यंत असावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचा अर्ज करावा. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येईल. 

हेही वाचा > धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...

हेही वाचा >VIDEO : निदान 'या' नऊ महिन्याच्या चिमुरडीचं तरी ऐका...'ती' काय म्हणतेय एकदा तरी बघाच​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scheme of the food grain of the center is applicable to NGOs in the state said by Chhagan Bhujbal