
कोरोनाच्या संकटाच्या चिंतेने संपूर्ण देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असतानाच नाशिककरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी आहे. कारण नाशिकमध्ये आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. संबंधिक संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
नाशिक : कोरोनाच्या संकटाच्या चिंतेने संपूर्ण देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असतानाच नाशिककरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी आहे. कारण नाशिकमध्ये आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. संबंधित संशयिताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला असुन तो कोरोना विषाणु बाधित असल्याचा निष्कर्ष अहवालात आलेला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये दुसरा कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती pic.twitter.com/zGEg82dP8i
— Sakal Nashik (@SakalNashik) April 6, 2020
नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये,
दरम्यान जिल्हयातील प्रथम कोरोना बाधित निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली . धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण परदेशातून आलेला नसून तो एका दुकानामध्ये कामाला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणु पॉझीटीव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरातील घरातील व्यक्तींचे साथरोग सर्वेक्षण पथकामार्फत सुरु करण्यात आले आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी कारोना साथीच्या नियंत्रणासाठी लक्ष ठेवून आहेत. नागरीकांनी घाबरुन जावु नये, घराबाहेर पडु नये, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे आपले हात नाक,तोंड,डोळे यांना लावण्याचे टाळा, असे आवाहन प्रशासनाने केले आहेत",