मोबाईल क्रमांक तर मरकजला गेलेल्या "आमदारांचा".. पण नाव मात्र दुसऱ्याचे..नेमका गोंधळ काय?

maulana mufti markaj.png
maulana mufti markaj.png

नाशिक / मालेगाव : दिल्ली येथील मरकजहून परतलेल्या दोघांची नावे उपलब्ध झाली आहेत. यातच आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा समावेश आहे. एकजण फैजाबाद येथे आहे. आमदारांना होम क्वारंटाइन केले आहे. शहरात विदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या 103 झाली आहे. त्यांपैकी 43 जणांची क्वारंटाइनची मुदत संपली असून, उर्वरित 53 जणांची नियमित तपासणी केली जात असल्याचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले. 

मोबाईल क्रमांक आमदारांचा, पण नाव दुसऱ्याचे 
जिल्हा प्रशासनाने दिल्ली येथून परतलेल्या दोघांची नावे व मोबाईल क्रमांक महापालिका प्रशासनाला कळविले आहेत. यातील एकजण फैजाबादमध्येच आहे. दुसऱ्या नावासमोरील मोबाईल क्रमांक आमदार मौलाना मुफ्ती यांचा आहे. प्रत्यक्षात नाव मात्र वेगळेच आहे. यामुळे हा गोंधळ नेमका काय, अशी चर्चा सुरू आहे. यात माजी आमदार आसिफ शेख यांनी महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार मौलाना मुफ्ती यांना क्वारंटाइन का केले याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती आयुक्त व अपर पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. या गोंधळातच गेल्या महिन्यातील महासभेत महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सायका अन्सारी यांची स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्याकडे प्रभारी पदभार होता. 1 एप्रिलपासून डॉ. सपना ठाकरे यांची महापालिका आरोग्याधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. याबाबत आयुक्त किशोर बोर्डे यांनी आदेश काढले आहेत. नवीन आरोग्याधिकाऱ्यांची नियुक्ती व आमदारांचे क्वारंटाइन हा निव्वळ योगायोग की काय, याचीही चर्चा सुरू आहे.  

उर्वरित तीन "स्वॅब'चे अहवाल निगेटिव्ह
परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेले व संशयास्पद वाटणारे दोन नागरिक आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. तपासणीसाठी पाठविलेले उर्वरित तीन "स्वॅब'चे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल प्रलंबित आहे. सामान्य रुग्णालयातून तिघांना घरी सोडले आहे. गुरुवारी (ता. 2) नवीन एकजण दाखल झाला. सामान्य रुग्णालयात चौघांवर उपचार सुरू आहेत. तालुक्‍यात गुरुवारी प्रमुख सहा महानगरांतून आलेल्या 144 जणांची वैद्यकीय तपासणी केल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी सांगितले. पोलिसांनी गुरुवारी संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली. पूर्व व पश्‍चिम भागात लॉकडाउनचे चांगले परिणाम जाणवत आहेत. भाजी बाजारातील गर्दीही सोशल डिस्टन्सिंग राखून मर्यादित करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com