ह्रदयद्रावक! "बाळा लवकर ये..हा बाप वाट बघून थकला आता" मुलाच्या भेटीसाठी पित्याचा आक्रोश

satish jayswal satpur bepatta.jpg
satish jayswal satpur bepatta.jpg

नाशिक : "तुमचा मुलगा परत येईल, असे सांगितल्यावर त्यांच्या धुंदक्यांचा बांध फुटला अन डोळ्यातून येणा-या अश्रूंना वाट करून देत मुलगा परत आल्यावर तुमच्या पाया पडायला येईल, असे त्या बापाने गदगदलेल्या स्वरांत सांगितले. अशा या बापाची ह्रदयद्रावक आपबिती वाचा पुढे....

पायाला भिंगरी लावल्यागत हतबल पिता घेतोय मुलाचा शोध
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मूळ उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रामनवल जयस्वाल हे सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. दहा वर्षांपूर्वी पत्नीचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर अवघ्या चार व सहा वर्षाच्या मुलामुलींचा सांभाळ त्यांनी नोकरी करत केला. मागील महिन्यात ते राहात असलेल्या सातपूर भागातील घरमालकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सुरक्षितता म्हणून त्यांनी मुलगा सतीश जयस्वाल (वय १४) व मुलगी दिपा (वय १६) यांना श्रमिकनगर येथे राहणा-या पुतण्याच्या घरी सोडले. १ तारखेला नाईट ड्युटी संपवून दुस-या दिवशी सकाळी ते पुतण्याकडे गेले. त्यावेळी दोन्ही मुलांना खाऊसाठी थोडे पैसे देऊन पुन्हा स्वतःच्या घऱी गेले. त्यानंतर काही वेळाने पुतण्याच्या पत्नीचा फोन आला की तुम्ही गेल्यावर सतीश काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला. यानंतर श्री जयस्वाल यांनी तातडीने श्रमिकनगर गाठत परिसरात सतीशचा शोध घेतला. त्यानंतर अशोकनगर, पंचवटी, सिडको येथील नातेवाईकांकडेही चौकशी केली, मात्र मुलगा मिळाला नाही. यामुळे हतबल झालेल्या जयस्वाल यांनी सातपूर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली. 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

आपके पाव छुने फिर आऊंगा 
या घटनेला आज आठ दिवस झाले असून सातपूर पोलिसांबरोबरच मुलाचे वडीलही पायाला भिंगरी लावल्यागत मुलाला शोध घेत आहेत. मुलाशिवाय कोणत्याही कामात रस वाटत नसल्याने त्यांनी आज दुपारी सकाळच्या कार्यालयात येऊन आपबिती सांगतली. तुमचा मुलगा परत येईल, असे सांगितल्यावर त्यांच्या धुंदक्यांचा बांध फुटला अन डोळ्यातून येणा-या अश्रूंना वाट करून देत मुलगा परत आल्यावर तुमच्या पाया पडायला येईल, असे गदगदलेल्या स्वरांत सांगितले. 

बेपत्ता मुले जातात कुठे? 
गेल्या काही वर्षांपासून शहरातून अल्पवयीन मुले व मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्यातील काही मुले व मुली परतली असून ती पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही तब्बल साठ टक्के मुलांचा शोध अद्यापही लागू शकलेला नाही. ही मुले नक्की जातात कुठे?, मानवी तस्करी करणा-या टोळ्या अस्तित्त्वात आहेत का? असे काही प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील घटना

सातवीत शिकणा-या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात घडली आहे. घटनेतील मुलाचे वडील औद्योगिक वसाहतीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असून पोलिसांबरोबरच ते स्वतःही गत आठ दिवसांपासून पायाला भिंगरी लावल्यागत मुलाचा शोध घेत आहेत. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com