esakal | VIDEO : भररस्त्यात सेल्फी काढायचा मोह तुम्हालाही असेल... तर हे नक्की पाहा...
sakal

बोलून बातमी शोधा

selfie on road.png

काही जण सेल्फीच्या नादात भरस्त्यावर उभ राहून देखील सेल्फी काढतात पण याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार देखील कोणी करत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सेल्फी घेण्यात दंग असणाऱ्या या मुली व्हिडिओत दिसत असून त्यांना पुढे काय होऊ शकतं याचा जराही अंदाज नसेल.

VIDEO : भररस्त्यात सेल्फी काढायचा मोह तुम्हालाही असेल... तर हे नक्की पाहा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सेल्फी काढायला कुठलंही कारण लागत नाही...जेव्हा मनाला वाटेल हव्या त्या ठिकाणी.. जो तो आपल्याला सेल्फी काढताना दिसतो. पण या सेल्फीमुळे अनेकदा लोकांच्या अंगलट आल्याचा प्रकारही समोर आला आहे.

आर यु अ सेल्फी लव्हर?

काही जण सेल्फीच्या नादात भरस्त्यावर उभ राहून देखील सेल्फी काढतात पण याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार देखील कोणी करत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सेल्फी घेण्यात दंग असणाऱ्या या मुली व्हिडिओत दिसत असून त्यांना पुढे काय होऊ शकतं याचा जराही अंदाज नसेल.

काय आहे व्हिडीओमध्ये?

दोन तरुणी सेल्फी काढण्यात एवढ्या दंग असतात की, रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे देखील या तरुणींचे लक्ष नसते. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की, सेल्फीचे वेड किती वाईट असते. मुलींच्या हातातला मोबाईल एक स्कूटरस्वार अलगद उचलून फरार होतो. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळलेल्या मुली आरडाओरडा करताना दिसतात. पण स्कूटरस्वार चोर सापडतो की नाही हे या व्हिडिओतून स्पष्ट झालेले नाही.

VIDEO : "माझा फोन टॅप केला असेल तर समजेल की मी किती उत्तम शिव्या देतो" - संजय राऊत

हेही वाचा > "कॉंग्रेसवर आरोप सूर्यावर थुंकण्यासारखे" - संजय राऊत