महात्मा गांधी जयंती २०२० : साडेसात फूट कापसाचा महात्मा गांधींचा पुतळा; गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

cotton idol of gandhi.jpg
cotton idol of gandhi.jpg

नाशिक : गंगापूर रोड येथील शिल्पकार अनंत खैरनार यांनी कापसाचा वापर करत साडेसात फुटांचा महात्मा गांधींचा पुतळा साकारला आहे. पुतळ्याच्या वैशिष्ट्यामुळे त्यांची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. २१ वर्षांपूर्वी साकारलेला पुतळा आजही सर्वांचे आकर्षण ठरत आहे. 

साडेसात फूट कापसाचा महात्मा गांधींचा पुतळा 
अनंत खैरनार यांनी ३० वर्षांपासून कापसाचा वापर करत शिल्प साकारण्याची कला जोपासताना अनेक महापुरुष आणि देव-देवतांचे कापसाचे शिल्प साकारले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे साडेसात फुटांचे शिल्प त्यांनी साकारले. त्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. २२ किलो कापूस आणि काही रसायनांचा वापर करतांना दैनदिन कामकाज संभाळत त्यांनी जागतिक विक्रम करणारे गांधींचे शिल्प साकारले. तत्पूर्वी त्यांनी गांधींचे लहानसे शिल्प साकारले होते. त्यांची नोंद गीनिज बुकात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी शिल्पाची नोंदणीही केली. गीनिज बुकच्या अधिकाऱ्यांनी यापेक्षा मोठे शिल्प साकरण्याचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला आत्मसात केला. त्यानंतर त्यांनी साडेसात फूट शिल्प साकारण्याचे काम सुरू केले. दोन वर्षांच्या परिश्रमानंतर १९९९ अर्थात, २१ वर्षांपूर्वी शिल्पाचे काम पूर्ण केले. त्यानंतर गीनिज बुकमध्ये नोंद करण्यासाठी पुन्हा नोंदणी केली. 

गांधी जयंतीनिमित्त कलाकाराची कलाकृती 
कापसातील कडकपणा कायम राहण्यासाठी विशिष्ट रसायनाचा वापर केला. त्यामुळे आजही शिल्प ‘जैसे थे’ आहे. शिवाय सर्वांचे आकर्षणही ठरत आहे. जागतिक रेकॉर्डची आठवण म्हणून श्री. खैरनार यांच्या घरात गांधींची शिल्प आजही सुस्थितीत आहे. गणपती, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, राम-सीता, महावीर, इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन असे विविध प्रकारचे सुमारे दोन हजार शिल्प त्यांनी साकारले आहे. तीस देशांमध्ये त्यांचे शिल्प पोचले आहे. नुकतेच गणेशोत्सवाच्या दरम्यान त्यांनी सोन्याचे आभूषणजडित तीन इंची कापसाची गणेशमूर्ती साकारली होती. हैदाबादच्या एका कुटुंबाने त्यांच्या घरात स्थापना केली होती. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

जागतिक विक्रम झालेले महात्मा गांधीचे कापसाचे शिल्प आपण साकारले असल्याचा गर्व वाटतो. लहान मुलांनाही कापसापासून मूर्ती साकारण्याची कला अवगत व्हावी, यासाठी त्यांना फावल्या वेळात प्रशिक्षण देत आहे. -अनंत खैरनार (शिल्पकार)  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com