तिची तब्ब्येत बरी नसल्याचा बहाणा करत 'तो' तिला घरी घेऊन जायचा...अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

(मालेगाव) शहरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर प्रकृती बरी नसल्याने तिला रुग्णालयात व घरी नेण्याचा बहाणा करून मदरशात काम, देखरेख, झाडलोट करणाऱ्या कर्मचाऱ्याने अडीच महिन्यांच्या कालावधीत गयासनगर भागातील घरी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीचे पोट दुखू लागल्याने ती दवाखान्यात तपासणीसाठी गेली असता, तिला दिवस गेल्याचे समजले. 

नाशिक : (मालेगाव) शहरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर प्रकृती बरी नसल्याने तिला रुग्णालयात व घरी नेण्याचा बहाणा करून मदरशात काम, देखरेख, झाडलोट करणाऱ्या कर्मचाऱ्याने अडीच महिन्यांच्या कालावधीत गयासनगर भागातील घरी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीचे पोट दुखू लागल्याने ती दवाखान्यात तपासणीसाठी गेली असता, तिला दिवस गेल्याचे समजले. 

अशी आहे घटना

मनमाड येथील गायकवाड चौक परिसरातील 16 वर्षीय तरुणी येथील मदरशात शिक्षण घेत होती. खुर्शीद अहमद अब्दुल हकीम (वय 52, रा. गयासनगर) याची पत्नी मदरशात स्वयंपाक करण्याचे काम करीत होती. खुर्शीद झाडलोट, किराणा आणून देणे यासह देखरेखीची कामे करीत होता. 20 डिसेंबर 2019 ते 6 मार्च 2020 या अडीच महिन्यांत खुर्शीदने या तरुणीची प्रकृती बिघडल्यानंतर दवाखान्यात व घरी नेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी जेवणातून गुंगीचे औषध देऊन रात्री झोपेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या तरुणीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, तिला दिवस गेल्याचे समजल्यानंतर धक्काच बसला. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रविवारी (ता. 22) आझादनगर पोलिस ठाण्यात 
खुर्शीद अहमदविरुद्ध बलात्कार व बालकांचे लैंगिक शोषण पॉक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, पोलिस शिपाई नवनाथ आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुर्शीद अहमदला गयासनगरातून 
अवघ्या अडीच तासांनंतर अटक केली. आझादनगर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुरुवार (ता. 26)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.  

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexual abuse of a minor girl nashik marathi news