धक्कादायक.. मित्राला बाईक, मोबाईल घेण्यासाठी "तिने' मारला चक्क डल्ला..!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

दुपारी आजीसोबत ती घरी आली. नागपाल यांनीही तिच्यावरच संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

नाशिक : नातलगाच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आजीसोबत गेलेल्या 15 वर्षांच्या मुलीने त्याच घरातून रोकड व सोन्याचे दागिने असा साडेसहा लाखांचा ऐवज चोरला. मुलीने चोरलेला ऐवज मित्राला मोबाईल आणि दुचाकी खरेदी करण्यासाठी दिला.

घटनाक्रम असा 
संशयित अल्पवयीन मुलीचा मित्र दीप धनंजय भालेराव (20) याला मोबाईल आणि दुचाकी घ्यायची होती. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. ती आजीसोबत वाढदिवसाला गेली त्या रात्री श्रीमती नागपाल यांच्या घरी चोरी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास तिने मित्राला नागपाल राहत असलेल्या घराजवळ बोलावून घेत, त्याच्याकडे चोरीचा ऐवज दिला. दुपारी आजीसोबत ती शालिमारला घरी आली. नागपाल यांनीही तिच्यावरच संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. जवळच्या नातलगामार्फत तिची चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली.

"तिने' केली साडेसहा लाखांची चोरी  

मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या जानकी राजेंद्र नागपाल यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. 14) त्यांच्या घरात वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शालिमार परिसरात राहणारी त्यांची नणंद आणि त्यांची 15 वर्षांची नात या दोघी आल्या होत्या. रविवारी रात्री त्या मुक्कामी राहिल्या. सोमवारी (ता. 15) दुपारी शालिमारला परतल्या. श्रीमती नागपाल यांना घरातून रोकड व सोन्याचे दागिने असा सहा लाख 59 हजार 720 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबई नाका पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास झाला. संशयित मित्राकडून चोरीच्या 26 हजार 100 रकमेसह दोन लाख 40 हजार 820 रुपयांचा ऐवज जप्त केला. सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळ, साजिद मन्सुरी, हवालदार बहारवाल यांनी कामगिरी बजावली. सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

मित्राला दुचाकी, मोबाईल घेण्यासाठी इतके केले

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत संशयित अल्पवयीन मुलीसह तिच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She stole for a friend to get a bike and a mobile phone nashik marathi news