esakal | प्रशिक्षण, फिजिकल ट्रेनिंगसाठी जीवन वेचलेले शेखर गवळी; क्रीडा क्षेत्रात हळहळ  
sakal

बोलून बातमी शोधा

shekhar gawali 123.jpg

 खेळाडू म्‍हणून अनेक स्‍पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना, पुढे जाऊन चांगले खेळाडू घडविण्यासाठी शेखर गवळी यांची कायम धडपड राहिली. क्रिकेटसोबतच वैयक्‍तिक स्‍तरावर शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करत. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, यापेक्षा आपल्‍या हातून चांगले खेळाडू घडावेत, या विचारांतून त्‍यांनी जीवन वेचले. 

प्रशिक्षण, फिजिकल ट्रेनिंगसाठी जीवन वेचलेले शेखर गवळी; क्रीडा क्षेत्रात हळहळ  

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : खेळाडू म्‍हणून अनेक स्‍पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना, पुढे जाऊन चांगले खेळाडू घडविण्यासाठी शेखर गवळी यांची कायम धडपड राहिली. क्रिकेटसोबतच वैयक्‍तिक स्‍तरावर शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करत. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, यापेक्षा आपल्‍या हातून चांगले खेळाडू घडावेत, या विचारांतून त्‍यांनी जीवन वेचले. 

विविध पातळ्यांवर स्‍वतःला केले सिद्ध

क्रिकेट खेळातील मानाच्‍या रणजी स्‍पर्धेत शेखर गवळी यांचा सहभाग राहिला. काही काळ रणजीच्‍या संभाव्‍य संघात सहभागी असलेले गवळी प्रत्‍यक्ष मैदानावर उतरत १९९७-९८, २००१-०२ मध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. उत्‍कृष्ट गोलंदाज (राइट आर्म लेग स्‍पीनर) म्‍हणून त्‍यांनी चांगली कामगिरी केली. पुढे विविध पातळ्यांवर प्रशिक्षक म्‍हणूनही स्‍वतःला सिद्ध केले. क्रिकेट आणि गिर्यारोहणाची त्‍यांना प्रचंड आवड होती. 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

क्रीडा क्षेत्रात हळहळ
राष्ट्रीय स्‍तरावरील स्पर्धांसाठी झोन लेव्‍हलला देवधर करंडक पश्‍चिम क्षेत्राचे प्रशिक्षक (फिजिकल ट्रेनर) म्‍हणून जबाबदारी सांभाळताना संघाने २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले होते. यात चैतेश्‍वर पुजारा, जसप्रित बुमरा यांच्‍यासारख्या खेळाडूंचा सहभाग होता. तर राज्‍यस्‍तरावर अनेक स्‍पर्धांमध्ये प्रशिक्षकपदाची धुरा त्‍यांनी सांभाळली. यात महाराष्ट्र (वरिष्ठ गट) रणजी संघ, महाराष्ट्र (१९ वर्षांतील) संघ, सी. के. नायडू करंडक, महाराष्ट्र २२ वर्षांतील संघात तसेच महाराष्ट्र ‘अ’ संघाचे प्रशिक्षक (फिजिकल ट्रेनर) म्‍हणून जबाबदारी सांभाळली. खेळाडू म्‍हणून आपल्‍या कारकीर्दीत पुणे विद्यापीठ संघाचा भाग असलेले व काही कालावधीसाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळताना, याच पुणे विद्यापीठाचे प्रशिक्षक म्‍हणूनही त्‍यांनी जबाबदारी सांभाळली. त्‍यांच्‍या निधनामुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्‍यक्‍त होत आहे.  

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ