VIDEO : " साहेब.. मालेगाव मधून लपून-छपुन येणाऱ्यांना आवरा" मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 26 May 2020

"मालेगाव मधील वाढत्या करोना ग्रस्तांमुळे नाशिक जिल्ह्याची संख्या दररोज वाढताना दिसतं आहे. मालेगाव मधून मोठ्या प्रमाणात नागरिक डनाशिक शहर व परिसरात लपून- छपून येत असल्याने नाशिक शहरातही कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. मालेगाव प्रमाणेचं नाशिक शहरात देखील झोपडपट्टी परिसरात रुग्ण वाढत असून वेळीच मालेगाव मधून ये-जा करणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालावा त्यामुळे नाशिक मध्ये रुग्णांमध्ये वाढ होणार नाही."

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी आहे परंतू मालेगाव अन्य शहरांमधून लपुन-छपून लोक नाशिक शहरात वास्तव्याला व कामानिमित्त येत असल्याने त्यांच्या मार्फत कोरोना फैलावत आहे. त्यामुळे अशा लोकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

मालेगाव मधून ये-जा करणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालावा
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. नाशिक मधून विजय करंजकर यांनी कोरोना परिस्थितीची माहिती दिली. मालेगाव मधील वाढत्या करोना ग्रस्तांमुळे नाशिक जिल्ह्याची संख्या दररोज वाढताना दिसतं आहे. मालेगाव मधून मोठ्या प्रमाणात नागरिक नाशिक शहर व परिसरात लपून- छपून येत असल्याने नाशिक शहरातही कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. मालेगाव प्रमाणेचं नाशिक शहरात देखील झोपडपट्टी परिसरात रुग्ण वाढत असून वेळीच मालेगाव मधून ये-जा करणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घालावा त्यामुळे नाशिक मध्ये रुग्णांमध्ये वाढ होणार नाही. यापुर्वी भाजपच्या शहरातील तिनही आमदारांनी मालेगावकरांवर निशाणा साधतं त्यांच्यामुळेच नाशिक मध्ये कोरोना वाढतं असल्याचा आरोप केला होता. आता शिवसेनेनेही त्याचप्रमाणे मालेगावकरांना नाशिक मध्ये येण्यास बंदी घालण्याची मागणी केल्याने कोरोनावरून नाशिक विरुध्द मालेगाव संघर्ष उभा राहताना दिसतं आहे. 

मविप्रला किटस पुरवा 
मालेगाव मध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतं असून त्यांचे स्वॅब मविप्रत्या मेडीकल कॉलेज मध्ये तपासणी साठी येत आहेत. त्याअनुशंगाने स्वॅब टेस्टींग कीट तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रमुख करंजकर यांनी केली. नाशिक शहरातील 45 वयाच्या आतील खासगी डॉक्‍टर, नर्सेस स्वेच्छेने काम करण्याची इच्छा व्यक्त करतं आहे. त्यांना पीपीई किट उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. त्यानुसार कोवीड योध्दा म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयात नावे नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

तर शिवसेना पुरवेल शेतमाल 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेने शेतकयांचा शेतमाल मुंबईत पोहोचविला. यामुळे शेतमाल योग्य दारात थेट ग्राहकांना मिळाल्याने स्वस्तात भाजी पुरवठा तर झालाचं त्याशषिवाय मध्यस्थी दलालांची साखळी संपुष्टात आली त्यामुळे यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर मोहिम राबविण्याची मागणी करंजकर यांनी केली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​

 

शिवसेनेच्या दोन भुमिका

या मागणीनंतर मालेगावकरांच्या दृष्टीने आता भाजप पाठोपाठ शिवसेना देखील रडारवर आल्याचे पाहायला मिळतं आहे. एकीकडे सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले दादा भुसे मालेगावकरांसाठी दिवस-रात्र करतं असताना एकाच जिल्ह्यासाठी शिवसेनेच्या दोन भुमिका पाहायला मिळतं असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. 

 हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena district leader appeals to CM, via video conference nashik marathi news