esakal | शिक्षण उपसंचालकपद वादग्रस्त व्यक्तीला देऊ नये ..शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

education123.jpg

शिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करावे, या मागणीचे पत्र शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे. 

शिक्षण उपसंचालकपद वादग्रस्त व्यक्तीला देऊ नये ..शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : शिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करावे, या मागणीचे पत्र शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे. 

वादग्रस्त प्रभारी शिक्षण उपसंचालकांना पदावरून पायउतार करा,
२०१३ च्या शासन निर्णयानुसार वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तीला त्या विभागातील महत्त्वाचे पद देऊ नये, असा नियम असताना दोन वर्षांपूर्वी दोन लाख तीस हजारांच्या लाच प्रकरणात दोषी असलेले प्रवीण पाटील यांना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालकपदाचा पदभार कसा देता येऊ शकतो, असा प्रश्न नीलेश साळुंखे यांनी पत्राद्वारे विचारला आहे. त्यांची नियुक्ती रद्द करून पारदर्शी व्यक्तीला शिक्षण उपसंचालकाचा पदभार द्यावा, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या स्वीय सहाय्यकांनी फोनद्वारे प्रवीण पाटील यांच्या नियुक्तीचा आढावा घेतला असून, वरिष्ठ स्तरावर यासंबंधी बदल घडू शकतात, असा अंदाज शिक्षण वर्तुळात व्यक्त केला जात आहे. मनसे, आम आदमी पार्टी, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, विद्यार्थी संघटना त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण पाटील यांना विरोध दर्शविल्यामुळे वातावरण आणखीन पेट घेणार आहे. यावर प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

नक्कीच या मागणीचा विचार होईल

भ्रष्टाचारी व्यक्तीला प्रभारी पदभार दिल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे यासंबंधी बदल करावे, अशी मागणी केली आहे. ते नक्कीच या मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील, याचा विश्वास वाटतो. -नीलेश साळुंखे, शिवसेना विभागप्रमुख, इंदिरानगर 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!