सोशल मीडियावरचा 'तो' एक मेसेज, लावून गेला हजारोंचा चुना; वाचा काय घडले?

युनूस शेख
Wednesday, 16 September 2020

गुंतवलेल्या रक्कमेच्या दोन किंवा २.५ पट रक्कम परतावा करतो. कमीत कमी २० हजारांची रक्कम गुंतवावी लागत असल्याचे त्याने सांगितले. ६ मार्चला अद्वैयने त्यास फोन करून २० हजार रुपये शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर संशयिताने नवीन स्कीम म्हणून दहा हजार रुपयांची रक्कम गुंतविण्यास सांगितले.

नाशिक : (जुने नाशिक) इन्स्टाग्राम अकाउंटवर आला तो एक मेसेज. तरुणाला वाटले हीच ती संधी सोने करण्याची. कुठलीही शहानिशा न करता केले धाडस. अन् नंतर मात्र जे घडले त्यानंतर युवकासोबत संपूर्ण घर हादरले. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

तक्रारदार अद्वैय टाकसाळे (वय २२, रा. टाकळी रोड) याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मार्चमध्ये गुंतवणुकीवर अतिरिक्त व्याज देण्याचा संदेश आला. त्यावर दिलेल्या मोबाईल नंबरवर अद्वैयने रोहित चौधरी नावाच्या संशयिताशी चर्चा केली. बिटकॉइन डिलर असल्याचे सांगत ग्राहकांनी त्यांच्या अकाउंटवर टाकलेली रक्कम बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करतो. गुंतवलेल्या रक्कमेच्या दोन किंवा २.५ पट रक्कम परतावा करतो. कमीत कमी २० हजारांची रक्कम गुंतवावी लागत असल्याचे त्याने सांगितले. ६ मार्चला अद्वैयने त्यास फोन करून २० हजार रुपये शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर संशयिताने नवीन स्कीम म्हणून दहा हजार रुपयांची रक्कम गुंतविण्यास सांगितले. २० मिनिटांत २४ हजार रुपये परत करतो, असे आमिष दाखविले. त्याने आमिषाला बळी पडत दहा हजारांची रक्कम संशयिताच्या खात्यावर पाठवली. त्याच दिवशी संशयिताने सर्व्हर डाउन आहे. बिटकॉइनमध्ये रक्कम गुंतविता आली नाही, असे सांगत टाळाटाळ केली. 

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच, संशयिताच्या क्रमांकावर फोन केला. संशयिताने आपला मोबाईल बंद केल्याचे समजले. संबंधित घटनेबाबत भद्रकाली पोलिसांत संशयित रोहित चौधरीविरुद्ध सात महिन्यांनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Showing the lure of doubles Fraud of tens of thousands nashik marathi news