श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान 

दिगंबर पाटोळे
Wednesday, 30 September 2020

अर्धे स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या नूतन विश्वस्त कार्यकारी मंडळ निवडीचा आदेश मंगळवारी (ता. २९) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी काढला. विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान देण्यात आले आहे. 

नाशिक / वणी : अर्धे स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या नूतन विश्वस्त कार्यकारी मंडळ निवडीचा आदेश मंगळवारी (ता. २९) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवासे यांनी काढला. विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान देण्यात आले आहे. 

विश्वस्त मंडळात प्रथमच महिलेस स्थान
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवी मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या संस्थेच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने पुढील पाच वर्षांसाठी नव्याने विश्वस्त मंडळ नेमणूक प्रक्रिया २ सप्टेंबरला कार्यान्वित करण्यात आली होती. यात नाशिक जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून १० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २१ ते २५ सप्टेंबर २०२० दरम्यान घेण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

स्थानिक प्रतिनिधी घेण्याची मागणी
उमेदवारांच्या मुलाखती व परिचयपत्र (बायोडाटा)चा विचार करून निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार १ ऑक्टोबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२५ या पाच वर्ष कालावधीसाठी अ‍ॅड. ललित रवींद्र निकम (शिवाजीनगर, कळवण), अ‍ॅड. दीपक राजाराम पाटोदकर (त्र्यंबक रोड, नाशिक), श्रीमती मंज्योत युवराज पाटील (गंगापूर रोड, नाशिक), डॉ. प्रशांत सुखदेव देवरे (गंगापूर रोड, नाशिक), भूषणराज शशिकुमार तळेकर (गंगापूर रोड, नाशिक) या पाच उमेदवारांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सप्तशृंगगडासह, नांदुरी, वणी येथील स्थानिक प्रतिनिधी घेण्याची मागणी असूनही विश्वस्त मंडळात स्थानिकांना स्थान न मिळाल्याने सप्तशृंगगड व वणीकर नाराजी व्यक्त करीत आहेत.  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Saptashrungi Trust Board of Trustees includes woman for the first time nashik marathi news