
नाशिक : दिल्ली येथील डिव्हाइन ग्रुप यांच्यातर्फे होत असलेल्या मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेत नाशिकच्या श्रीया स्वप्नील तोरणे हिने अव्वल सहामध्ये स्थान पटकावले आहे. तसेच रॅम्पवॉककरिता उत्कृष्ट स्पर्धक होण्याचा बहुमान मिळविला आहे. स्पर्धेच्या पुढील फेरीत सहभाग नोंदविताना, भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची संधी श्रीयासाठी उपलब्ध असणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी
मिस अर्थ इंडिया-२०२० स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत देशभरातील हजारो युवतींनी सहभाग नोंदविला होता. यातून ४० युवतींची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात १५ स्पर्धकांची निवड करत त्यांच्याकडून विविध आव्हाने पार पाडण्यात आली. या स्पर्धेकरिता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दरम्यान, या १५ स्पर्धकांमधून अंतिम सहा उमेदवारांची निवड केलेली असून, यात नाशिकच्या श्रीया तोरणे हिचा समावेश आहे. यापुढील फेऱ्यांमध्येदेखील अशीच चमकदार कामगिरीची अपेक्षा श्रीयाकडून व्यक्त केली जात आहे. तिने यापूर्वी मिस टीन युनिव्हर्स इंडिया, मिस टीजीपीसी इलाइट अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.