आनंदवार्ता! कन्फर्म तिकीट नसल्यासही मिळणार हमखास जागा; धावणार सहा क्लोन रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

१९ जूनपासून देशात २०० विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यांपैकी ४० गाड्या भुसावळ विभागातून धावत आहेत. त्यात सहा क्लोन गाड्यांची भर पडल्याने साळवी भागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आता ४२ होईल. या गाडीत फक्त आरक्षण राहील. या गाड्यांचा अग्रीम आरक्षण अवधी दहा दिवसांचा असेल. 

नाशिक : (भुसावळ)अनेक रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे रेल्वे आता क्लोन गाड्या अर्थात, एकाच मार्गावर दोन गाड्या चालविणार आहे. त्यामुळे प्रवाशांना नियमित गाडीने कन्फर्म तिकीट न मिळाल्यास त्याच मार्गावर धावणाऱ्या क्लोन गाडीत प्रवाशांना हमखास जागा मिळणार आहे.

कन्फर्म तिकीट न मिळाल्यास त्याच मार्गावरील क्लोन गाडीत हमखास जागा 

भुसावळ विभागातून अप व डाउन मार्गावर आठवडाभरात सहा क्लोन गाड्या धावणार आहेत. लॉकडाउनमध्ये सर्वच रेल्वे बंद होत्या. १९ जूनपासून देशात २०० विशेष गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यांपैकी ४० गाड्या भुसावळ विभागातून धावत आहेत. त्यात सहा क्लोन गाड्यांची भर पडल्याने साळवी भागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आता ४२ होईल. या गाडीत फक्त आरक्षण राहील. या गाड्यांचा अग्रीम आरक्षण अवधी दहा दिवसांचा असेल. 

भुसावळ विभागातून जाणाऱ्या गाड्या 

वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन (०७३७९ डाउन) क्लोन विशेष गाडी २५ सप्टेंबरपासून दर शुक्रवारी दुपारी साडेबाराला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी ४.२० ला हजरत निजामुद्दीद्दिन स्थानकात पोचेल. ही गाडी शनिवारी मनमाड ०८.१५/०८.२०, भुसावळ- १०.५५/११.०० ला येईल. यात वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, चार कोच शयनयान श्रेणीचे असतील. हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा (०७३८० अप) क्लोन विशेष गाडी २७ सप्टेंबरपासून दर रविवारी दुपारी एकला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पावणेपाचला वास्को दी गामा स्थानकात पोचेल. सोमवारी भुसावळ- ०५.२०/०५.२५, मनमाड- ०७.४५/०७.५०, पुणे, मिराज, बेलगावी, लोंडा, मडगाव येथे थांबेल. यशवंतपूर ते हजरत निजामुद्दिन (०६५२३ डाउन) क्लोन विशेष गाडी २३ सप्टेंबरपासून दर बुधवारी, शनिवारी प्रस्थान स्थानकातून दुपारी एकला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी दीडला हजरत निजामुद्दिन स्थानकात पोचेल. ही गाडी गुरुवारी, रविवारी मनमाड- १५.१०/१५.१५, भुसावळ- १७.४५/१७.५० ला थांबेल. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर (०६५२४ अप) क्लोन विशेष गाडी २६ सप्टेंबरपासून दर शनिवारी, मंगळवारी ८.४५ ला रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी ६.२० ला यशवंतपूर स्थानकात पोहोचेल. ही गाडी मार्गात रविवारी, बुधवारी भुसावळ- ०१.०५/०१.१०, मनमाड- ०३.४०/०३.४५, पुणे, बेलगावी, धारवार, हुबली, हावेरी, दवांगेरे, अर्सिकेरे, तुमकुरू या स्थानकांत थांबेल. सुरत ते छपरा (०९०६५ डाउन) क्लोन विशेष गाडी सोमवार (ता. २१)पासून सातला रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता छपरा स्थानकात पोहचेल. या गाडी मार्गात भुसावळ १३.२५/१३.३० येथे थांबेल. छपरा ते सुरत (०९०६६ अप) क्लोन विशेष गाडी २३ सप्टेंबरपासून दर बुधवारी सकाळी साडेआठला रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ ला छपरा स्थानकात पोहचेल. गुरुवारी भुसावळ येथे ०९.२०/०९.२५ वाजता थांबेल. या सर्व गाड्यांमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी १२ कोच, ४ कोच शयनयान श्रेणीचे असतील. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six clone trains will run in Bhusawal division nashik marathi news