#Lockdown : कोटमे बंधूंचे खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन! गरजूंची केली 'अशी' मदत

kotme bro.png
kotme bro.png

नाशिक / येवला : कोटमगाव खुर्द (ता. येवला) येथील शेतकरी हृषीकेश कोटमे व दीपक कोटमे यांनी संचारबंदी काळात गावासह येवल्यातील अनेक कुटुंबांना मोफत टोमॅटोचे वाटप केले. कोटमे बंधूंनी सुमारे 30 क्रेट (सहाशे किलो) टोमॅटोचे वाटप केले. एकीकडे अनेक जण भाजीपाला चढ्या दराने विक्री करत असताना कोटमे बंधूंनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन आपल्या कृतीतून दाखवून दिले. 

भाजीपाला चढ्या दराने विक्री होत असताना माणुसकीचे दर्शन 
आपण पिकविलेले बाजारात नेतो. त्याला कमी-अधिक प्रमाणात पैसेही मिळतातच, पण हाच भाजीपाला गरीब गरजू शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मिळाला तर नक्कीच त्यांची गैरसोय दूर होईल या हेतूने प्रगतिशील शेतकरी कोटमे बंधूंनी तब्बल 600 किलो टोमॅटोचे कोटमगाव व येवल्यात वाटप केले. सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिक्रेटला 200 रुपयांचा भाव मिळत आहे. असे 30 क्रेट या बंधूंनी वाटप केल्याने तब्बल सहा हजार रुपयांचे नुकसान मंदीच्या काळातही त्यांनी सहन केले. परंतु नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कुटुंबाने पैशांच्यापुढे माणुसकी श्रेष्ठ असल्याचे यात कृतीतून दाखवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com