मध्य रेल्वेकडून सहा महिन्यांत २५ दशलक्ष टन मालाची वाहतूक!

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Monday, 28 September 2020

कोळशाच्या एक लाख ८३ हजार ५३८ वाघिणीची विद्युत केंद्रांवर वाहतूक केल्याने वीज केंद्रांना ऊर्जा मिळाली. रेल्वेने ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेळेवर माल पोचण्यासाठी मालगाड्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवल्या आहेत. ​

नाशिक : (नाशिक रोड) मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉकदरम्यान २३ मार्च २०२० ते २३ सप्टेंबर २०२० या कालावधीत ४.८५ लाख (वॅगन) वाघिणीमधून २५.४६ दशलक्ष टन मालाची यशस्वीपणे वाहतूक केली. कोळशाच्या एक लाख ८३ हजार ५३८ वाघिणीची विद्युत केंद्रांवर वाहतूक केल्याने वीज केंद्रांना ऊर्जा मिळाली. रेल्वेने ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेळेवर माल पोचण्यासाठी मालगाड्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवल्या आहेत. 

२५ दशलक्ष टन मालाची वाहतूक 

२३ मार्च २०२० ते २३ सप्टेंबर २०२० या कालावधीत वीज केंद्रासाठी कोळशाच्या एक लाख ८३ हजार वाघिणी, तसेच शेतकऱ्यांसाठी २२ हजार ६५२ वाघिणी खते व सात हजार ३२३ वाघिणी कांदे वाहून नेले. पेट्रोलियमच्या ४७ हजार ३८४ वाघिणी, लोखंड आणि स्टीलच्या १३ हजार ५३, सिमेंटच्या ३१ हजार २५१ वाघिणी नेल्या. एक लाख ५० हजार २१२ कंटेनरच्या वाघिणी आणि सुमारे २३ हजार ९७९ डी-ऑइल केक वाहतूक केली. २३ मार्च ते २३ सप्टेंबरपर्यंत चार लाख ८५ हजार २०२ वाघिणीची वाहतूक केली आहे. त्यात दहा हजार १५० मालगाड्यांतून कोळसा, धान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेल्या. या कालावधीत दररोज सरासरी दोन हजार ६२३ वाघिणी माल भरला गेला.  

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In six months from Central Railway Transport of 25 million tons of goods nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: