समाजाला लाठ्याकाठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज - छगन भुजबळ

दत्ता जाधव  
Monday, 19 October 2020

शेतकरी व नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सोडविताना प्रसंगी लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना काम करायचे आहे,

नाशिक : शेतकरी व नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सोडविताना प्रसंगी लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना काम करायचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १७) केले. 

शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत हंसराज वडघुलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे विद्यमान राज्याध्यक्ष हंसराज वडघुले यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. श्री. वडघुले यांच्याबरोबरच चंद्रकांत बच्छाव, राम निकम, शरद लभडे, रतन मटाले, शरद घुगे, नीलेश बिरारे यांनीही पक्षात प्रवेश केला. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

समाजाला लाठ्याकाठ्या खाणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज 
राज्यातील शेतकरी चळवळीत योगदान देण्यासाठी वडघुले यांनी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते स्वर्गीय शरद जोशी व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काहीकाळ काम केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोट बांधून शेट्टी यांच्या मागे ती उभी करण्यात श्री. वडघुले यांचे मोठे योगदान राहिले. याशिवाय त्यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतही संचालक म्हणून काम केले आहे. शेतकरी संघटनेत काम करताना त्यांनी अनेक जिल्हास्तरीय आंदोलनेही यशस्वी केली. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

केवळ शेतकरीहित : वडघुले 
आजवर शेतकरीहितासाठीच काम केले. यापुढेही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी व शेतकरीहितासाठी सहकाऱ्यांसह प्रवेश करत असल्याचे श्री. वडघुले यांनी सांगितले. यापुढे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील वाढीसाठी तना-मनाने प्रयत्न करू, असे ते म्हणाले. शेतकरी, नागरिकांच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी लाठ्याकाठ्या खाण्याची वेळ आलीतरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची पक्षाला व समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन श्री. भुजबळ यांनी प्रवेशानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: society needs militant activists said by chhagan bhujbal nashik marathi news