esakal | उत्तर महाराष्ट्रात चार जिल्ह्यांत ९६ टक्के खरिपाच्या पेरण्या! मुबलक पावसाने पाण्याची चिंता मिटली 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer 3.jpg

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात शेतीला उपयुक्त पाऊस पडलेला असला तरी तो काही ठिकाणी जास्त पडला आहे, तर काही ठिकाणी मुबलक झाला आहे. याचा कमी-अधिक परिणाम येणाऱ्या काळात शेतीवर होणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात चार जिल्ह्यांत ९६ टक्के खरिपाच्या पेरण्या! मुबलक पावसाने पाण्याची चिंता मिटली 

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांत ९६.८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. २१ हजार ६२३.४५ हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार ९४३.०३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. 

पावसाचा कमी-अधिक परिणाम येणाऱ्या काळात शेतीवर 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात शेतीला उपयुक्त पाऊस पडलेला असला तरी तो काही ठिकाणी जास्त पडला आहे, तर काही ठिकाणी मुबलक झाला आहे. याचा कमी-अधिक परिणाम येणाऱ्या काळात शेतीवर होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत विशेषकरून भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका, भुईमूग, सोयाबीन, ऊस, तूर, मूग, उडीद, तीळ, तेलबिया, काळा सूर्यफूल ही पिके प्राधान्याने घेतली जातात. गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 


खरीप पेरणीची विभागाची आकडेवारी 
जिल्हा क्षेत्र कंसात टक्के 

१. नाशिक जिल्हा- ६४९३.९१ (९५.०४ टक्के) 
२.धुळे जिल्हा -४०८७.४८ (९८.०३) 
३. नंदुरबार जिल्हा-२८६७.२३ (९७.१२) 
४.जळगाव जिल्हा-७४९४.४१ (९७.७३)