VIDEO : वायूप्रदूषणाचा गंभीर प्रश्न..विद्यार्थ्यांचे हेल्मटमधून "अनोखे' संशोधन!

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नाशिक शहरातील वायूप्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आहे त्या परिस्थिती आपले आरोग्य आपण कसे सुदृढ ठेवू शकतो, यासाठी हेल्मेटचा वापर संरक्षणासाठीच नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी होऊ शकतो, याचे संशोधन करीत ते आज (ता.१२) आपल्या शाळेत सादर केले. 

नाशिक : शाळेमध्ये अटल टिंकरींग लॅब आहे आणि विद्यार्थी यामधून काहीना काही प्रयोग करीत असतात. असाच एक प्रयोगातून संशोधन केले आहे ते इस्पॅलियर स्कूलचा विद्यार्थी चिराग अहिरे आणि त्यांच्या मित्रांनी. नाशिक शहरातील वायूप्रदूषणाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आहे त्या परिस्थिती आपले आरोग्य आपण कसे सुदृढ ठेवू शकतो, यासाठी हेल्मेटचा वापर संरक्षणासाठीच नव्हे तर शुद्ध हवा घेण्यासाठी होऊ शकतो, याचे संशोधन करीत ते आज आपल्या शाळेत सादर केले. 

हेल्मटमधून शुद्ध हवा अन्‌ समोरील वाहनाचे संकेत 

नाशिक शहर व परिसरात सध्या सर्व स्तरावर वायु प्रदूषण खूप वाढले आहे. दिल्लीसारख्या शहरात तर शुद्ध हवा मिळतच नाही. यासारखे कमी-अधिक प्रमाणात चित्र इतर शहरात ही दिसते. या गोष्टीचं भान ठेवत इस्पॅलियर स्कूल मधील सातवीच्या विद्यार्थी चिराग आहिरे याने असेहेल्मेट बनवली की खूप प्रदूषणामध्ये हेल्मेट घातले तर तुम्हाला आतून फक्त शुद्ध हवाच आत येईल. हेल्मेट ला बाहेर एअर फिल्टर लावून आत शुद्ध हवा हेल्मेट धारकास मिळेल. या हेल्मेट मध्ये अजून एक प्रयोग केला गेला आहे.

 इस्पॅलियर स्कूलमधील अटल टिंकरींग लॅबमध्ये चिराग अहिरे व त्याच्या मित्रांनी साकारलेले आगळ- वेगळे हेल्मेट. त्यांना यासाठी प्रोहत्सान देणारे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी. 

आगळावेगळा प्रयोग...!

तो म्हणजे बऱ्याचवेळा दुचाकी/बाईक यांचा लाईट खराब झालेला असतो. नेमका त्याच वेळेस रात्री चालवताना रस्त्यावरील लाईट बंद पडतात किंवा हाय वे वर लाईट नसतात. अशा वेळेस समोरील वाहनचालकास बाईक येत आहे, हे अजिबात समजत नाही आणि अपघात होण्याची दाट शक्‍यता निर्माण होते. चिराग ने या हेल्मेट त्याला एल.डी.आर सेन्सर लावले असून जेव्हा ही हेल्मेट अंधारात जाते, तेव्हा आपोआप हेल्मेटवर लाईट पेटतात. त्यामुळे समोरील वाहनांना लक्षात येते की समोरून बाईक येत आहे आणि अपघाताचा धोका टळतो. हे आगळी- वेगळी हेल्मेट बनवायला स्कूलचे विज्ञान शिक्षक सोनू कदम, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी मदत व प्रोत्साहन दिले.

हेही वाचा > जायचं होतं श्रीलंकेला....पण टूर कंपनीनेच केला स्वप्नांचा चुराडा!

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special experiment on air pollution made by students of Imperial School