Sakal Impact : "पैसे द्या..नाही तर चालत या',एजंट्सकडून मजूरांची लूट...'सकाळ'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग!

lockdown nsk 1.jpg
lockdown nsk 1.jpg
Updated on

नाशिक : परप्रांतीय मजुरांच्या वाटमारीचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित होताच खडबडून जाग आलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने परप्रांतीय मजुरांची लूट करून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई सुरू केली आहे. यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी "सकाळ'ला दिली. 

मजूरांची होत होती लूट...सकाळच्या वृत्ताची दखल

लॉकडाउनमुळे गेलेला रोजगार व परिस्थिती लक्षात घेऊन गावाकडे जाण्याची ओढ लागलेल्या परप्रांतीय मजुरांकडून अधिकचा पैसा घेऊन वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून लूट सुरू आहे. परप्रांतीयांच्या या वाटमारीत ट्रकचालकच एजंट झाले आहेत. "पैसे द्या, नाही तर चालत या', या भूमिकेतून हे एजंट लूट करीत असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये रविवार प्रसिद्ध झाले. हे वृत्त वाचून जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने सहाय्यक निरीक्षकांचे विशेष पथक तयार करीत वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. तसेच ट्रकचालकांकडून मिळणारी माहिती व बसलेल्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या माहितीचीही शहानिशा हे पथक करीत आहेत. चौकशीत तफावत आढळणाऱ्या ट्रकचालकावर कारवाई करून त्याचा ट्रक जप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

परप्रांतीयांच्या वाटमारीच्या कारवाईसाठी विशेष पथक 
कळसकर यांनी सांगितले, की ट्रकमधील मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेवर सोडण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रकमधील मजुरांना एसटी बसमधून मोफत मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत सोडले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे अवैध लूट करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आणि ट्रकमधून मजुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी चोवीस तास आरटीओचे पथक लक्ष ठेवणार आहे. परप्रांतीय मजुरांकडून अव्वाच्या सव्वा पैसे लाटणाऱ्या एजंट्‌सवरही पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com