अखेर स्पीड पोस्ट सुविधेला वेग; टप्प्याटप्प्याने इतर देशांतही सेवा; टपाल विभागाची माहिती

युनूस शेख
Wednesday, 7 October 2020

विभागाच्या महसुलावरही परिणाम झाला होता. जूनपासून कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी होत असताना चीन, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, कॅनडा, न्यूझीलंड अशा ३५ देशांनी त्यांची विमानसेवा पूर्ववत केली. त्यामुळे या देशात स्पीड पोस्ट सुविधा पूर्ववत करण्यात आली.

नाशिक : (जुने नाशिक) टपाल विभागाकडून चीनसह ३५ देशांमध्ये स्पीड पोस्ट सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशाने काही महिने टपाल विभागाच्या विविध सेवा बंद करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्याने अन्य देशांत सुविधा सुरू होणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. 

टप्प्याटप्प्याने इतर देशांतही सेवा

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जगातील सर्वच देशांनी काळजी घेतली. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने टपाल विभागाच्या सेवा अन्य देशांत पुरविणे शक्य नव्हते. देशातून परदेशात पाठविण्यात येणारे स्पीड पोस्ट, पार्सल सेवा टपाल विभागाने बंद केल्या होत्या. विभागाच्या महसुलावरही परिणाम झाला होता. जूनपासून कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी होत असताना चीन, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, कॅनडा, न्यूझीलंड अशा ३५ देशांनी त्यांची विमानसेवा पूर्ववत केली. त्यामुळे या देशात स्पीड पोस्ट सुविधा पूर्ववत करण्यात आली. ज्या देशांची विमानसेवा सुरू नाही, त्यांची सेवा अद्याप बंद आहे. त्या देशांनी विमानसेवा सुरू केल्यास तेथेही सुविधा सुरू केली जाईल, अशी माहिती टपाल विभागाने दिली. 

पार्सलवरील बंदी कायम 

टपाल विभागाकडून ३५ देशात केवळ स्पीड पोस्ट सुविधा पुरविली जाईल. पार्सल सेवेवर मात्र बंदी कायम आहे. स्पीड पोस्टमध्ये केवळ कागदपत्र पाठविण्याची व्यवस्था असते. पार्सलमध्ये काय आहे, याची माहिती नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत पार्सलवर बंदी कायम राहील. 

सेवा सुरू असलेले देश 

चीन, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, कॅनडा, न्यूझीलंड, बेल्झीयम, डेनमार्क, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, हंगरी, इंडोनेशिया, इटली, जपान, जॉर्डन, कोरिया, मॅक्सिको, म्यानमार, नेदरलॅंड, नॉर्वे, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका, स्वीडन, स्वीत्झर्लंड, थायलंड, तुर्की, अमेरिका, यूक्रेन, दुबई, व्हिएतनाम. 

हेही वाचा >  चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

३५ देशांची विमानसेवा सुरू असल्याने टपाल विभागाची स्पीड पोस्ट सेवा दिली जात आहे. त्यानिमित्ताने स्पीड पोस्ट बुकिंग केले जात आहे. - एस.आर. जाधव, वरिष्ठ पोस्ट मास्तर, जीपीओ  

हेही वाचा > भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed ​​post facility started in countries nashik marathi news