स्थायी सभापतिपदाच्या निकालावरून न्यायालयाकडून "तारीख पे तारीख'..भाजपच्या गोटात धास्ती..!  

nashik nmc bjp.jpg
nashik nmc bjp.jpg

नाशिक : स्थायी समिती सभापतिपदासाठी उच्च न्यायालयाने बंद पाकिटात मागितलेल्या अहवालावर गुरुवारी (ता.19) सुनावणी झाली नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचेच दावे निकाली काढण्याची भूमिका न्यायालयाने घेतल्याने स्थायी सभापतिपदाच्या दाव्यावर 26 मार्चला निकाल देण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात धास्ती निर्माण झाली आहे. 

कोरोनाचा न्यायालयाच्या कामकाजावरही परिणाम
तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर शिवसेनेचा एक अतिरिक्त सदस्य नियुक्त व्हावा, या शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती केली. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी शासनाकडे तक्रार केली. नगरविकास विभागाने निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने 6 मार्चला सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचे आदेश दिले. सभापती निवडणुकीचा निकाल बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्याच्या सूचना दिली. 11 मार्चला सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्तांच्या वस्तुनिष्ठ अहवालाचा आधार घेत नवी याचिका दाखल केल्याने न्यायालयाने 19 मार्चला सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु कोरोनाची साथ पसरण्याचा धोका असल्याने न्यायालयाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला. त्यानुसार न्यायालयाने 26 मार्च ही तारीख जाहीर केली. 

"तारीख पे तारीख' सुरू..भाजपमध्ये धास्ती
सभापतिपदासाठी भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु आता न्यायालयाकडून "तारीख पे तारीख' सुरू असल्याने भाजपमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com