"राष्ट्रीय आपत्तीमध्ये उपाशी राहू नये म्हणून 24 तास दक्षता" - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 11 April 2020

"सकाळ'शी बोलताना भुजबळ म्हणाले, की अन्न-नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून, पुरवठा विभागाचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे अत्यंत काळजीने सर्वांनी हे काम करावे. अन्न-नागरी पुरवठा विभागातर्फे नागरिकांच्या सोयी- सुविधांसाठी 24 तास यंत्रणा उभारण्यात आली आहे. राज्यभरातून रोज अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त होतात. त्यांचे निराकरण केले जाते.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य व पोलिस विभागासोबतच राज्याच्या अन्न-नागरी पुरवठा विभागाकडे राज्यातील नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी आहे. त्यानुसार आपण स्वतः राष्ट्रीय आपत्तीमध्ये कुणीही उपाशी राहणार नाही, यासाठी लक्ष ठेवून असून, नाशिकमधील कक्षातून तक्रारी-समस्यांचे निराकारण केले जात आहे. दहा दिवसांमध्ये एप्रिलमधील अन्नधान्याचे 70 टक्के वाटप झाले. पंतप्रधान कुटुंब कल्याण योजनेंतर्गत प्राप्त तांदळाचे आठ लाख 80 हजार जणांना वाटप करण्यात आले, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

राज्यात एप्रिलमधील 70 टक्के अन्नधान्याचे वाटप पूर्ण - भुजबळ

रेशन दुकानदार, पुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत असल्याबद्दल त्यांना भुजबळांनी धन्यवाद दिले. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांनी एकूण उद्दिष्टाच्या 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकचे धान्य वाटप केले, त्या जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली. त्याचबरोबर कमी अन्नधान्याचे वाटप झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. "सकाळ'शी बोलताना भुजबळ म्हणाले, की अन्न-नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून, पुरवठा विभागाचे काम जोखमीचे आहे. त्यामुळे अत्यंत काळजीने सर्वांनी हे काम करावे. अन्न-नागरी पुरवठा विभागातर्फे नागरिकांच्या सोयी- सुविधांसाठी 24 तास यंत्रणा उभारण्यात आली आहे. राज्यभरातून रोज अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त होतात. त्यांचे निराकरण केले जाते. राज्यातील सर्व जनतेचे लक्ष अन्न-नागरी पुरवठा विभागाकडे असून, कामात अनियमितता, कुठली तक्रार असल्यास विभागाचे नाव बदनाम होईल. त्यामुळे आपल्या कामाचा वेग वाढवून कुठलीही तक्रार येणार नाही, विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही, असे नियोजन करावे हे आपण अधिकाऱ्यांना सांगितले आहे. 

रोजचे एक हजार कॉल 
भुजबळ यांनी स्वतःचा, खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यकांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. त्याद्वारे दिवसाला किमान एक हजार कॉल येतात. त्याचबरोबर व्हॉट्‌सऍपवरून मेसेज येतात. chhagan.bhujbal@gov.in या मेल आयडीवरून तक्रारी प्राप्त होतात. त्यासंबंधाने संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपनियंत्रकांना सूचना देऊन लगेच तक्रारींचे निरसन केले जाते. रेशन दुकान बंद आहे, अधिक भावाने धान्य दिले जाते, केशरी रेशनकार्डला धान्य मिळत नाही, रेशनकार्ड नाही; पण आम्हाला धान्य मिळावे, किराणा दुकानातून अधिक भावाने विक्री होते अशा स्वरूपाच्या तक्रारी असतात. तक्रारींच्या अनुषंगाने रेशन दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सोनोशी (जि. बुलडाणा) येथील रेशन दुकानदार अधिक पैसे घेत असल्याची तक्रार होती. त्याची दखल घेत भुजबळ यांनी दुकानदाराचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रावेर, वाघोदा (जि. जळगाव) येथील दुकानदार अधिकचे पैसे घेत असल्याच्या तक्रारींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत याही दुकानदाराविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले. दुकानदार मुजोरी करत तरुणांना मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंदूरबारच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराचा परवाना रद्द केला. 

हेही वाचा > PHOTOS : नमस्कार, मी सुप्रिया सुळे बोलते ! तुम्ही खूप चांगलं काम केलं.. तुमचं कौतुक अन् आभारही!"
आकडे बोलतात 
- राज्यातील रेशन दुकान संख्या : 52 हजार 426 
- कार्डधारकांची संख्या : एक कोटी 60 लाख 28 हजार 113 
- धान्यवाटप झालेले कार्डधारक ः एक कोटी दहा लाख 62 हजार 917 
- वाटप अन्नधान्य ः 15 लाख 17 हजार 890 क्विंटल गहू, 11 लाख 76 हजार 730 क्विंटल तांदूळ, 13 हजार 880 क्विंटल साखर 
- पोर्टेब्लिलिटीतून अन्नधान्याची वाटप संख्या : पाच लाख 15 हजार 467 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the state 70 percent of the food allocation in April is complete said by chhagan Bhujbal nashik marathi news