
सरकारकडून आज विधिमंळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यामधे कित्येक वर्षापासून नाशिकच्या लोकप्रतिनिधीकडून सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आज नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने राज्याच्या वाटा देण्यास मान्यता दिली.
नाशिक : सरकारकडून आज विधिमंळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या निमिर्तीला आज राज्याच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे नाशिक-मुंबई-पुणे या तीन शहरांच्या विकासाचा सुर्वण त्रिकोण पूर्ण होणार आहे.
खासदार गोडसेंच्याप्रयत्नांना यश
नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी खासदार हेमंत गोडसे गेल्या काही वर्षापासून प्रयत्नशील आहेत. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी दोनदा उणे अहवाल असतांना वेळोवेळी संसदतेत आवाज उठवून या प्रकल्पाला मंजुरी मिळविली आहे. त्यांच्या प्रयत्नातून या मार्गाचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गासाठी निधी आणि जमिनी अधिग्रहित कामास विलंब होत असल्याने महसूल, अर्थ आणि नियोजन विभागाच्या एकत्रित बैठकीसाठी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु होता. केंद्राच्या मान्यतेनंतर राज्याच्या वाट्याच्या २० टक्के निधीसाठी त्यांनी मंत्रालयात बैठकीसाठी पाठपुरावा केला होता.
हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर
कनेक्टिव्हिटीचा सुवर्णत्रिकोण
नाशिक रोड, पुणे सेमी सेमी हाय स्पीड डबल रेल्वे मार्गामुळे राज्यातील मुंबई पुणे आणि नाशिक हे महत्वाचे तीन जिल्हे जवळ येणार आहे. याशिवाय लगतच्या नगर जिल्ह्यांच्या विकासासाठी एक वरदानच ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे औद्योगिक, कृषी, आयटी, अॅटोमोबाईल्स या क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने प्रशासकिय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी राज्य शासनास्तरावर
प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्य शासन वाटा उचलणार असल्याचे स्पष्ठ करीत, मंत्री मंडळाच्या मान्यतेची मोहर उमटविली.
सेमी हायस्पीड रेल्वेची वैशिष्ट्य
- मेट्रो ट्रेनपेक्षा कमी राजधानीपेक्षा आधिक वेग
- नाशिकहून पावने दोन तासात पुण्यात पोहोचणार
- केंद्र शासनासोबत राज्य शासन भार उचलणार
- १९९२ पासून मागणी आणि सर्व्हेक्षण,पाठपुरावा
- नाशिक पुणे रेल्वेमार्ग प्रकल्प १६५०० कोटी
- केंद्र व राज्य शासनाचा वाटा प्रत्येकी २० टक्के
- साठ टक्के निधी भाग भांडवलातून उभे केले जाणार
हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुंबई पुणे नाशिक शहर आणि त्यातील औद्योगिक वसाहती परस्परांना जोडल्या जाउन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
- हेमंत गोडसे (खासदार नाशिक)