नाशिकमध्ये चार हजार रेमडेसिव्हिरचा साठा; भरारी पथकाद्वारे तपासणी सुरू

विनोद बेदरकर
Wednesday, 30 September 2020

जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा होत असलेला काळा बाजार लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथक प्रत्येक औषधालय/हॉस्पिटल्सला भेट देऊन साठ्याची माहिती, विक्री यांची शहानिशा करीत आहे. 

नाशिक : कोविड रुग्णालयाशी संलग्न ५० मेडिकल स्टोअरमध्ये दोन हजार ३६८ रेमडेसिव्हिर उपलब्ध असून, मंगळवारी (ता. २९) एक हजार ६६६ नवीन इंजेक्शन पुन्हा मिळाली आहेत. मंगळवारी (ता. २९) चार हजार ३४ रेमडेसिव्हिर उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना किरकोळ स्वरूपात रेमडेसिव्हिरची आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी वोक्हार्ट, अपोलो व अशोका हॉस्पिटल यांच्या औषधालयांमध्ये ती उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

भेट देऊन साठ्याची माहिती, विक्री यांची शहानिशा...

श्री. मांढरे म्हणाले, की रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा व रुग्णांची पायपीट टाळून पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. प्रत्येक मेडिकल दुकानावर रेमडेसिव्हिरच्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती दिली जात असल्याने सुसूत्रता आली आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा होत असलेला काळा बाजार लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथक प्रत्येक औषधालय/हॉस्पिटल्सला भेट देऊन साठ्याची माहिती, विक्री यांची शहानिशा करीत आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

जिल्ह्यात औषधपुरवठा व ऑक्सिजनच्या बाबतीत कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. रेमडेसिव्हिरचा काळा बाजार होत असेल किंवा या संदर्भात तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक ९७६६८११२७९ व ८७८०१८६६८२ वर तक्रार नोंदवावी. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

हेही वाचा > मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stocks of four thousand Remedesivir in Nashik marathi news