बिबट्यानंतर आता भटक्या कुत्र्यांचीही दहशत; निफाडकरांत भीतीचे वातावरण

माणिक देसाई
Sunday, 11 October 2020

परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः: हैदोस घातला आहे. यातच काही कुत्र्यांनी शहर व विंचूर भागातील पाच जणांना देखील चावा घेतला. कुत्र्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत असून नगरपंचायतीने तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

नाशिक : (निफाड) शहरातील जनार्दन स्वामीनगर, गणेशनगर, शंकरनगर, उगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः: हैदोस घातला आहे. यातच काही कुत्र्यांनी शहर व विंचूर भागातील पाच जणांना देखील चावा घेतला. कुत्र्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत असून नगरपंचायतीने तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस 

निफाड शहरातील उपनगरांमध्ये सध्या मोठ्या संख्येने कुत्रे टोळक्याने फिरत आहे. जर कोणी या कुत्र्यांच्या टोळक्यास पळवून लावण्याचा प्रयत्न केल्यास ही कुत्रे थेट त्यांच्यावर हल्ला करत आहे. या सर्व गोष्टींचा त्रास खास करून लहान मुलांसह पहाटे, सायंकाळी व रात्री फिरायला जाणाऱ्यांना होत आहे. शुक्रवारी उगाव रोडने फिरणाऱ्या लोकांवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला. तसेच विंचुर बस स्थानकात विशाल बर्डे या मुलाला तर चौफुली येथे दत्तात्रय बोडके (वय ४०) यांना चावा घेतला. 

नाशिक शहरातून कुत्रे निफाडला 

नाशिक महापालिका हद्दीतील कुत्रे पहाटेच्या वेळी गाडीतून शहरालगतच्या शांतीनगर चौफुली येथे सोडले जातात त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

उगाव रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रस्थ कमालीचे वाढले आहे. ते हिंसक बनत असल्यामुळे नागरिक धास्तावले आहे. या रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला निघतात. त्याचवेळी नागरिक कुत्र्यांचे लक्ष ठरत आहे . - मधुकर शेलार 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stray dogs increased in the city of Niphad nashik marathi news