esakal | "अत्यंत घृणास्पद प्रकार! आठ महिन्याच्या बालकासोबत अघोरी कृत्य.. कठोर कारवाई करण्याची अंनिसची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

andhshraddha 1.jpg

बोरधा गावातील शाम सज्जु हा आठ महिन्याच्या बालक आजारी होता. वडिलांनी दवाखान्यात न नेता त्याला मांत्रिकाकडे नेले. खोकल्याचा व पोट फुगीचा त्रास कमी करण्यासाठी हा अघोरी उपाय करण्यात आला. जे वाचून अंगावर काटा येण्यावाचून राहणार नाही.​

"अत्यंत घृणास्पद प्रकार! आठ महिन्याच्या बालकासोबत अघोरी कृत्य.. कठोर कारवाई करण्याची अंनिसची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : बोरधा गावातील शाम सज्जु हा आठ महिन्याच्या बालक आजारी होता. वडिलांनी दवाखान्यात न नेता त्याला मांत्रिकाकडे नेले. खोकल्याचा व पोट फुगीचा त्रास कमी करण्यासाठी हा अघोरी उपाय करण्यात आला. जे वाचून अंगावर काटा येण्यावाचून राहणार नाही.

"अत्यंत घृणास्पद प्रकार! 

चिखलदरा तालुक्यातील बोरधा या आदिवासी गावात अंधश्रध्देतून आठ महिन्याच्या बालकाच्या पोटावर विळा गरम करुन शंभर चटके देण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सदर बालकाच्या पित्यासह मांत्रिकाला अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

हेही वाचा > धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

कठोर कारवाई करण्याची अंनिसची मागणी
बोरधा गावातील शाम सज्जु हा आठ महिन्याच्या बालक आजारी होता. वडिलांनी दवाखान्यात न नेता त्याला मांत्रिकाकडे नेले. खोकल्याचा व पोट फुगीचा त्रास कमी करण्यासाठी हा अघोरी उपाय करण्यात आला. सदर बालकाला चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित बालकाच्या पित्यासह मांत्रिकाला तातडीने अटक करावी अशी मागणी डॉ. पवार यांनी केली आहे.  

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..

go to top