मतदानावेळी गैरवर्तन केल्यास कडक कार्यवाही होणार - पोलिस अधीक्षक सचिन पाटील

सागर आहेर
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणतेही गैरवर्तन झाल्यास थेट गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

चांदोरी (जि. नाशिक) : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणतेही गैरवर्तन झाल्यास थेट गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

आज  बुधवार (ता. १३) रोजी सायंकाळ नंतर ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या तरी त्यानंतर अंतर्गत कोणतेही गैरप्रकार झाल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात कडक कार्यवाही होणार असून तक्रारीनंतर दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त

जिल्ह्यातील एकूण 566 ग्रामपालिकेसाठी शुक्रवारी (ता. १५)  मतदान होणार आहे. त्यात सर्वाधिक मालेगाव तालुक्यातील 96 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. जिल्हा पोलिस दलाकडून वाढीव कुमक तैनात करण्यात आलेली आहे. यात राज्य राखीव पोलीस बलची 120 जवानांची एक तुकडी, बाहेरून 250 पोलिस कर्मचारी तर 600 होमगार्ड तैनात असतील. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 

राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून नियम पाळावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी सतर्कता ठेवावी. जिल्ह्यात तेरा तालुक्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल. सर्वच  प्रतिस्पर्धी उमेदवारांनी व गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सलोखा पाळावा. - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action will be taken in case of misconduct during polling nashik marathi news