परीक्षा पास झाले..यादीही लागली.. पण कोरोनाने रखडवली नियुक्ती!

talathi exam.jpg
talathi exam.jpg
Updated on

नाशिक / येवला : जिल्ह्यात तलाठी भरतीसह नियुक्तीची प्रक्रिया सुरू होऊन वर्ष झाले मात्र अद्यापही या पदावरील नियुक्ती पूर्ण झाल्या नाही. यातील ८3 जण तलाठी पदासाठीची परीक्षा पास झाले.त्यांची यादीही लागली पण कोरोना आला आणि प्रक्रिया रेंगाळल्याने त्यांची नियुक्ती रखडली असून या महामारीत नियुक्ती करून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी असे आर्जव हे उत्तीर्ण विद्यार्थी तरूण करत आहेत.

वर्षांनंतर जिल्ह्यातील ८३ उत्तीर्ण विद्यार्थी तलाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
मागील वर्षी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ८३ तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. बेरोजगारांची प्रचंड संख्या असल्याने जिल्ह्यासह राज्यातून या जागांसाठी २२ हजार ५०० जणांचे अर्ज दाखल झाले होते. पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जुलै महिन्यात परीक्षेची प्रक्रिया राबवत नाशिकमध्ये विविध केंद्रावर या सर्वांची लेखी परीक्षा घेतली.नियमानुसार यावर्षी जानेवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाल्याने नवेवर्ष गुड न्यूज देणार अशी अपेक्षा या तरुणांना लागली होती.१७ व १८ फेब्रुवारीला या तरुणांच्या कागदपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणीही झाल्याने आता काही दिवसात आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळतील,असे स्वप्न हे युवक पाहू लागले आणि अचानकपणे कोरोना नावाचा राक्षस येऊन धडकला आणि या युवकांच्या स्वप्नांना ब्रेक लागला असुन चार महिने उलटूनही हे उत्तीर्ण तलाठी उपविभागातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली

कोरोनामुळे आता आर्थिक घडी विस्कटल्याने शासनाने पुढील दोन वर्ष आरोग्य विभाग वगळता इतर विभागांमध्ये भरती होणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण युवक आपल्याला नियुक्ती भेटेल की नाही
या संभ्रमात पडले आहे.मागील तीन ते चार वर्षे अभ्यास केल्यानंतर या परीक्षांमध्ये यश मिळतं आणि समाज उपयोगात येण्यासाठी स्वतःचं ज्ञान वापरण्याची संधी भेटावी ही प्रत्येक अभ्यासू परीक्षार्थी इच्छा असते‌. त्यामुळे परिस्थितीमध्ये आपण उत्तीर्ण तर झालो आहोत मग या कठीण परिस्थितीत प्रशासनाला कामात हातभार लावून सेवा करण्याची संधी भेटल्यास अधिक चांगले असे म्हणून हे युवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांना अद्याप कोणतेही संकेत न भेटल्यामुळे उत्तीर्ण तलाठी संभ्रमात आहेत.

कठीण परिस्थितीत शासनाला मदत करायची आहे

"नोकरीच्या शोधात दोन वर्ष अभ्यास केला, परीक्षेत यश मिळाले अन स्वप्नपूर्तीचा आनंद गगनात मावेना.मात्र आता वर्ष होईल पण अद्याप नियुक्ती बाबत सूचना भेटलेली नाही. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग या कठीण परिस्थितीत शासनाला मदत करण्यास झाल्यास अधिक आनंद वाटेल."-एक उत्तीर्ण विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com