VIDEO : 'वनवास संपणार तरी कधी?' मोदींना पत्र पाठवत विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन

अरुण मलाणी
Wednesday, 5 August 2020

विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी यावेळी केली. राज्‍यभरातून हे पत्र पाठविले जाणार असून, यावर निर्णय झाला नाही तर लवकरच राज्‍यभरात विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करुन मोठा पायी मोर्चा काढला जाईल, असा इशारा यावेळी दिला आहे.

नाशिक : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीत शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले असून, विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्‍या परीक्षेचा मुद्दा चिघळत चालला आहे. त्‍यातच राम मंदिर उभारणीला मुहुर्त लागला. त्‍याप्रमाणे विद्यार्थ्यांचाही वनवास संपावा, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

विद्यार्थ्यांच्या समस्या लवकर सोडवण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्‍या प्रलंबित प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी बुधवारी (ता.५) अनोख्या प्रकारे आंदोलन केले. दुपारच्‍या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी कॉलेजरोड येथील टपाल कार्यालय परीसरात जमले होते. ज्‍याप्रमाणे पाचशे वर्षांचा प्रभू श्रीरामांचा वनवास संपला, तसा विद्यार्थ्यांचाही वनवास संपावा. यासाठी विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी यावेळी केली. राज्‍यभरातून हे पत्र पाठविले जाणार असून, यावर निर्णय झाला नाही तर लवकरच राज्‍यभरात विद्यार्थ्यांकडून सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करुन मोठा पायी मोर्चा काढला जाईल, असा इशारा यावेळी दिला आहे.

हेही वाचा > आठवणीतील अयोध्या : जेव्हा शिवसैनिकांच्या चैतन्याने भारावला होता ‘शरयू’चा काठ.. नाशिकमधील शिवसैनिकांची कार्यक्रमात छाप

प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी त्‍यांच्‍या घराबाहेर विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात येतील, अशी भूमिका युवा नेते ॲड. अजिंक्‍य गिते यांनी स्‍पष्ट केली आहे. याप्रसंगी ॲड अजिंक्य गीते, जय कोतवाल, महेश गायकवाड, वैभव वाकचौरे, स्वप्नील मोरे, अभिजीत गोसावी, विनोद येवलेकर, शरद आडके, संकेत मुठाळ आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students sent letter to PM Modi regarding pending issues of students Nashik Marathi News