उपनिरीक्षकासह एकाला ६० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

उपनिरीक्षकासह एकाला ६० हजारांची लाच घेताना अटक केल्याने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. तक्रारदाराविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होता. 80 हजारांची बोली झाली होती. त्यातील ६० हजारांची लाच घेताना उपनिरीक्षकासह एकाला रंगेहाथ पकडले. वाचा सविस्तर घटना

नाशिक : (मालेगाव) उपनिरीक्षकासह एकाला ६० हजारांची लाच घेताना अटक केल्याने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. तक्रारदाराविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होता. 80 हजारांची बोली झाली होती. त्यातील ६० हजारांची लाच घेताना उपनिरीक्षकासह एकाला रंगेहाथ पकडले. वाचा सविस्तर घटना

असा आहे प्रकार

मंगळवारी (ता. १३) तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वीजचोरी व फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयितांवर कारवाई न करता मदत करण्यासाठी खासगी मध्यस्थामार्फत ६० हजार रुपयांची मागणी करून ही रक्कम स्वीकारताना संशयित मध्यस्थ व तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप ठाकरे यांना नाशिक विभाग लाचलचुपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. सायंकाळी तालुका पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होता. संबंधिताने मध्यस्थ अब्दुल रहेमान अब्दुल कादीर (रा. इमदादनगर, मालेगाव) याच्यामार्फत ५ ऑक्टोबरला २० हजार रुपये दिले होते. उर्वरित ६० हजार रुपये घेण्यासाठी आजचा दिवस निश्‍चित करण्यात आला होता. या दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा >  धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, हवालदार कुशारे, गोसावी, मोरे व पोलिस नाईक दाभोळे यांनी सायंकाळी तालुका पोलिस ठाण्यात सापळा रचून अब्दुल रहेमानला ६० हजार रुपये लाच घेताना अटक केली. ही रक्कम उपनिरीक्षक ठाकरे यांच्यासाठी घेतल्याने दोघांविरुद्ध रात्री उशिरा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, तसेच खासगी व्यक्तीने शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कडासने यांनी केले आहे.  

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sub-inspector Arrested while accepting bribe of Rs 60 thousand nashik marathi news