VIDEO : नाशिकमध्ये प्रथमच बहुगुणी 'ब्लॅक राईस'चा यशस्वी प्रयोग; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

black rice 1.png
black rice 1.png

नाशिक : भारतामध्ये‘ब्लॅक राईस’उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भागात ब्रह्मा व्हॅली संस्थेचे प्रमुख राजाराम पागव्हाणे
यांनी पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे.

कॅन्सरसह विविध आजारासाठी उपयुक्त

ब्लॅक राईस मध्ये फायबर,मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.‘ब्लॅक राईस’खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळतो असे . त्यामुळे‘ब्लॅक राईस’हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती पानगव्हाणे यांनी दिली.

अकरा एकरात‘ब्लॅक राईस’ची लागवड

राजाराम पागव्हाणे यांनी अकरा एकरात‘ब्लॅक राईस’ची लागवड केली. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही पानगव्हाणे यांनी यावेळी दिली.

औषधी गुणधर्म असलेला ब्लॅक राईस

दैनंदिन भोजनात पांढरा ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु‘ब्लॅक राईस (काळा तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com