वातावरण बदल सोसवेना! रुग्णसंख्येत वाढ; शहरवासियांना तापमानाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

दिवाळीपूर्वी आठवडाभर नाशिकध्ये थंडीला सुरुवात झाली होती. हळूहळू तापमान खाली येत असल्याने नाशिककरही या गुलाबी थंडीचा आनंद लुटत होते. त्यातच दिवाळीच्या तयारीला वेग आल्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते.

नाशिक : दिवाळीपूर्वी आठवडाभर नाशिकध्ये थंडीला सुरुवात झाली होती. हळूहळू तापमान खाली येत असल्याने नाशिककरही या गुलाबी थंडीचा आनंद लुटत होते. त्यातच दिवाळीच्या तयारीला वेग आल्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे शहरात सर्दी, ताप यांसारख्या वातावरणबदलामुळे होणाऱ्या आजारांनी डोके वर काढले आहे

आजारांनी डोके वर काढले

गेल्या आठवड्यापासून थंडी अनुभवणाऱ्या नाशिककरांना दोन दिवसांत अचानक वाढलेल्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, ताप व सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: लहान मुले, तसेच वृद्धांमध्ये हे आजार अधिक प्रमाणात निदर्शनास येत आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, तसेच तापाच्या समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

आहारात करावा असा बदल

वातावरणातील अचानक बदलांमुळे वृद्धांमध्ये सांधेदुखीची समस्याही बळावण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांत तापमान वाढलेले असले, तरी पुन्हा थंडी पडण्याची शक्यता असल्याने, आहारविहारात हळूहळू बदल करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.गेल्या आठवड्यापासून थंडी अनुभवणाऱ्या नाशिककरांना दोन दिवसांत अचानक वाढलेल्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, ताप व सर्दीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudden rise in temperature in nashik marathi news