थरारक! चिमुकला धरायला गेला कासरा..अन् हाती लागला चक्क कोब्रा..काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

खुट्याला बांधलेला बैल दावं सोडून पळाला म्हणून सुटलेल्या बैलामागे पळत जाऊन दावं धरण्यास वाकलेल्या चिमुरड्याच्या हातात दावं ऐवजी चक्क अतिविषारी कोब्राच आला. अन् मग जे काही घडलं ते अंगावर काटा आणणारे होते. 

नाशिक / नांदगाव : खुट्याला बांधलेला बैल दावं सोडून पळाला म्हणून सुटलेल्या बैलामागे पळत जाऊन दावं धरण्यास वाकलेल्या चिमुरड्याच्या हातात दावं ऐवजी चक्क अतिविषारी कोब्राच आला. अन् मग जे काही घडलं ते अंगावर काटा आणणारे होते. 

धरायला गेला काय..अन् हाती लागला चक्क कोब्रा
नांदगाव येथून जवळ असलेल्या फुलेनगर येथील थापा वस्ती शिवारात ज्ञानेश्वर राऊत यांचा खुंट्याला बांधलेला बैल हिसका देऊन पळाला. पळालेल्या बैलाचे दावं अर्थात कासरा पकडण्यासाठी त्यांचा बारा वर्षीय अर्थव हा मुलगा पळणाऱ्या बैलामागे लागला. कासरा सापडला म्हणून खाली वाकून ते उचलण्यास गेलेल्या अर्थवच्या हातात चक्क विषारी कोब्राच आला. कोब्राने अर्थवच्या दोन्ही हातांना कडाडून दंश केल्याने तो जखमी झाला. सर्पदंश झाल्याचे बघून घरातील मंडळींनी त्याला घाईघाईने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

चौदा डोसनंतर प्रकृतीत सुधारणा 
वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी तातडीने उपचार केले. डॉ. बोरसे यांनी अर्थवला प्रतिविष असलेले ए एसव्हीचे इंजेक्‍शन दिली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याला भेटण्यासाठी सर्पमित्र प्रभाकर निकुंभ आले. त्यांना अर्थवची प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना डॉ. बोरसे यांना कळविली. डॉ. बोरसे यांनी पुन्हा तातडीने प्रतिविषाचे तेरा डोस दिले. यामुळे जीवघेण्या संकटातून अथर्वची सुटका झाली असून राऊत कुटूंबातील अर्थव हा एकुलता मुलगा आहे. विषारी नागाने चावा घेतल्याने त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suddenly boy catches Cobra nashik nandgaon marathi news