Lockdown4.0 : साखर स्थिरावली अन् खाद्यतेलांच्या भावात मात्र घसरण 

kirana 123.jpg
kirana 123.jpg

नाशिक : ओला वाटाणा मिळत नाही म्हणून हिरव्या वाटाण्याला ग्राहकांनी पसंती दिलीय. रगड्यासाठी पांढरा वाटाणा खपतोय. तसेच भाजीसाठी काबुली चन्याचा खप वाढलाय. त्यासोबत बाजरी आणि ज्वारीचा भाव वधारला आहे. दुसरीकडे साखरेचे भाव स्थिरावलेले असून, खाद्यतेलांच्या भावात मात्र घसरण झाली आहे. लॉकडाउनमधील अन्नधान्याच्या बाजारपेठेची ही स्थिती आहे. 

वाटाणा, काबुली चना, ज्वारी-बाजरी वधारले 

साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने भावात वृद्धी झालेली नाही. सर्वसाधारणपणे 36 ते 37 रुपये किलो भावाने साखर विकली जात आहे. वाटाण्याच्या भावातील वाढ मात्र मोठी आहे. 70 ते 80 रुपये भावाने विकला जात असलेला हिरवा वाटाणा आता 180 रुपये किलोने विकला जात आहे. पांढऱ्या वाटाण्याचा किलोचा भाव 60 ते 65 रुपयांवरून 90 रुपयांवर पोचला आहे. या दोन्ही प्रकारचा वाटाणा बाहेरील देशातून येतो. त्याचबरोबर बर्मामधून आयात होणारा काबुली चना 80 ते 85 रुपयांवरून 110 रुपयांवर पोचला आहे. सोयाबीन वडी 70 रुपयांवरून शंभर रुपये झाली आहे. ज्वारी 33 ते 34 रुपये किलोच्या पुढे कधीही गेलेली नाही. आता मात्र तिचा भाव 37 ते 55 रुपयांपर्यंत गेला आहे. 26 ते 27 रुपये किलो भावाने विकल्या जाणाऱ्या बाजरीलाही आता 30 रुपये द्यावे लागताहेत. याखेरीज शेंगदाण्याच्या भावामध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. 90 रुपये किलो भावाने विकले जाणारे शेंगदाणे मध्यंतरी 120 ते 130 रुपयांवर पोचले होते. आता 110 रुपये किलो असा भाव आहे. 
 
गुजरात-कर्नाटकमधून येते शेंगदाणा तेल 
गुजरात आणि कर्नाटकमधून शेंगदाणा तेल येते. पूर्वी एक लिटरचा भाव 145 ते 150 रुपयांपर्यंत होता. तो आता 130 ते 135 रुपये असा आहे. सूर्यफूल तेल शंभर रुपयांवरून 90 ते 92 रुपये आणि सोयाबीन तेल 95 रुपयांवरून 85 ते 87 रुपये, तर पामतेल 85 रुपयांवरून 78 रुपये किलो या भावाने विकले जात आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

नाशिककरांसाठी लागणारे अन्नधान्य 
(आकडे दिवसाच्या खपाचे आहेत) 
0 गहू ः 50 ट्रक (प्रत्येक ट्रकमध्ये 20 टन) 
0 शेंगदाणे ः 5 ट्रक (प्रत्येकी 20 टन) 
0 बाजरी आणि ज्वारी ः प्रत्येकी 5 ट्रक (प्रत्येकी 20 टन) 
0 हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, काबुली चना ः प्रत्येकी 25 कट्टे (एकाचे वजन 30 किलो) 
0 खाद्यतेल ः 10 ट्रक 

स्वाभाविकपणे अन्नधान्याच्या भावात वाढ
वाहतुकीसाठी क्विंटलला 120 रुपये खर्च यायचा. आता दोनशे रुपये द्यावे लागतात. त्यामुळे स्वाभाविकपणे अन्नधान्याच्या भावात वाढ झाली आहे. नवीन गव्हाची आवक सुरू झाल्यावर भाव कमी होतात. पण 27 ते 28 रुपये किलो भावाने विकल्या जाणाऱ्या गव्हाच्या भावात मार्चमध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे. हरभऱ्याचा भाव 55 ते 56 रुपये किलो असा स्थिर राहिला आहे. -प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक घाऊक किराणा व्यापारी असोसिएशन 
 

उत्पादन वाढले, पण तुलनेत मागणी नाही

लॉकडाउनमध्ये ग्राहकांनी दोन ते तीन महिन्यांचे खाद्यतेल खरेदी केले. त्यातच, हॉटेले अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे उत्पादन वाढले, पण त्या तुलनेत मागणी नसल्याने खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. -परेश बोघानी, खाद्यतेलाचे घाऊक व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com