मनोविकाराने त्रस्त विवाहिता वरच्या खोलीत बंद ..सकाळी दरवाजा उघडताच माहेरच्यांना धक्का!

woman muslim.jpg
woman muslim.jpg

नाशिक / मालेगाव  : सायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती.त्यामुळे ती वरच्या खोलीत बंद होती..पण अचानक एके दिवशी सकाळी माहेरच्यांनी दरवाजा उघडला तर धक्कादायक चित्र समोर होते.

अशी आहे घटना

सायराबानो शेख उमर असे महिलेचे नाव आहे. सायराबानो हिचे सासर शहरातील नोमानीनगर येथे आहे. तिला मनोविकाराने ग्रासले असल्याने २०१५ पासून तिच्यावर सुरत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील तीन-चार महिन्यापासून तिचे औषध संपले होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाहने बंद होती. खासगी वाहनाने जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने तिला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाही. औषधोपचार न मिळाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. या नैराश्यातून रात्री आठच्या सुमारास माहेरी रौनकाबाद येथे वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तर समोरच सायराबानोचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. अशी माहिती भाऊ मोहम्मद शाकीर याने पोलिसांना दिली. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने उचलले पाऊल

(मालेगाव मध्य) शहरातील रौनकाबाद येथील एका महिलेने शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरातील रौनकाबाद येथे शनिवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली. मनोविकाराने त्रस्त असलेल्या या महिलेस लॉकडाऊनमुळे औषधोपचार न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com