उन्हाळ कांद्याचे भाव घसरले! दरात २०० ते ३०० रुपयांनी घट 

संतोष विंचू
Tuesday, 6 October 2020

तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी लिलावात उन्हाळ कांद्याचे भाव घसरलेले दिसले. येथे उन्हाळ कांदा सरासरी २,७०० रुपये दराने खरेदी झाला.

येवला (जि. नाशिक) : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (ता. ५) लिलावात उन्हाळ कांद्याचे भाव घसरलेले दिसले. येथे उन्हाळ कांदा सरासरी २,७०० रुपये दराने खरेदी झाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत चालू आठवड्यातील सोमवारी उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल कमाल २०० रुपयांनी, तर सरासरी ४५० रुपयांनी घसरला.

चार हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक

आवारात सोमवारी ३६७ ट्रॅक्टरमधून सुमारे चार हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. याठिकाणी स्थानिक खरेदीदार कांदा व्यापाऱ्यांनी उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ३,८०० (सरासरी २,७००) रुपये याप्रमाणे खरेदी केला. अंदरसूल उपबाजार आवारात सोमवारी १२० ट्रॅक्टर आणि ४७ रिक्षा, पिक-अपमधून एकूण सुमारे दोन हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. येथे उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ३,७६० (सरासरी २,५००) असा दर मिळाला. येवल्यात शुक्रवारी (ता. २) उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४,०१५ तर सरासरी ३,१५० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.  

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer onion prices fall yeola nashik marathi news