श्री सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवर सुर्यकिरणांचा अभिषेक; थंडीतही हजारो भाविकांची उपस्थिती

दिगंबर पाटोळे
Sunday, 27 December 2020

साडेतीन शक्तीपीठांंपैकी अर्थे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी (वणी गड) गडावर आज (ता. २७) आदिमायेच्या धनुर्मास उत्सवातील दुसऱ्या रविवारी आदिमायेच्या मूर्तीवर पडणारे सुर्यनारायणाचे किरणे 'याची देही याची डोळा' पाहूण  हजारो भाविक श्री सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले.

वणी ( जि. नाशिक)  : साडेतीन शक्तीपीठांंपैकी अर्थे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंगी (वणी गड) गडावर आज (ता. २७) आदिमायेच्या धनुर्मास उत्सवातील दुसऱ्या रविवारी आदिमायेच्या मूर्तीवर पडणारे सुर्यनारायणाचे किरणे 'याची देही याची डोळा' पाहूण  हजारो भाविक श्री सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले.

राज्यभरातून हजारो भाविकांची उपस्थिती

राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळा बरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकशीत होत अससेल्या सप्तशृंगी गडावर शुक्रवारची नाताळाची सुट्टी, चौथा शनिवार व रविवारची आलेल्या सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीचा योग साधत आज धनुर्मासातील दुसरा रविवार असल्याने आदिमायेच्या मूर्तीवर पडणाऱ्या सुर्याचे किरण (किरणोत्सव) बघण्यासाठी बघण्यासाठी  गुजरात, मध्यप्रदेशा बरोबरच राज्यभरातून हजारो भाविक सकाळी पहाटेच्या कडकडणाऱ्या गुलाबी थंडीत आदिमायेच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. धनुर्मासातील महापुजेस सकाळी पाच वाजेपासून पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. महापुजा झाल्यानंतर नियमाप्रमाणे मंदिर गाभाऱ्यांतील विद्युत दिवे बंद करुन महाआरती संपन्न झाली.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suns rays touched the feet of the goddess saptshrungi nashik marathi news