esakal | विहिरीतून 'वाचवा वाचवा' आवाज कानी पडताच ह्रदयाचा चुकला ठोका! थरारक रेस्क्यू ऑपरेशन
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (69).jpg

दुपारची वेळ... शिवजयंती असल्याने सायखेडा पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी करंजी गावाकडे गस्तीसाठी जात असतानाच ‘वाचवा वाचवा’ असा एका महिलेचा आवाज येतो. आवाज खोल असतो. दोन्ही पोलिस कर्मचारी गाडी थांबवतात. आवाज येतो, पण दिसत तर कोणी नाही. ते आवाजाच्या दिशेने चालू लागतात.

विहिरीतून 'वाचवा वाचवा' आवाज कानी पडताच ह्रदयाचा चुकला ठोका! थरारक रेस्क्यू ऑपरेशन

sakal_logo
By
संजय भागवत

सायखेडा (जि.नाशिक) : दुपारची वेळ... शिवजयंती असल्याने सायखेडा पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी करंजी गावाकडे गस्तीसाठी जात असतानाच ‘वाचवा वाचवा’ असा एका महिलेचा आवाज येतो. आवाज खोल असतो. दोन्ही पोलिस कर्मचारी गाडी थांबवतात. आवाज येतो, पण दिसत तर कोणी नाही. ते आवाजाच्या दिशेने चालू लागतात. तोच एका विहिरीतून आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात येते. दोघेही विहिरीत डोकावून बघतात तर काय, पोलीस कर्मचाऱ्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकतो. काय घडले पुढे....

विहिरीतून 'वाचवा वाचवा' आवाज कानी पडताच ह्रदयाचा चुकला ठोका!

ही घटना आहे निफाड तालुक्यातील करंजी शिवारातील. करंजी- तामसवाडी रस्त्यावरील शेतात शुक्रवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास सीताबाई रामचंद्र निंबाळकर (वय ७३) या पाय घसरून विहिरीत पडल्या. अचानक झालेल्या घटनेने त्या जिवाच्या आकांताने मदतीसाठी आवाज देत होत्या. पण, एक दिवस आधीच पाऊस झाल्याने जवळपास कोणीही शेतात काम करण्यासाठी आलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणीही येत नव्हते. त्याचवेळी शिवजयंती असल्याने सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी एस. पेखळे व मनोज एशी गस्तीसाठी तामसवाडीहून करंजीकडे जात असताना विहिरीत पडलेल्या सीताबाई निंबाळकर यांच्या आवाजाने ते थबकतात आणि त्यांना विहिरीत वृद्धा दिसते. ते तातडीने विहिरीत सोडलेल्या पाइप त्या महिलेला आधार देण्यासाठी तिच्या दिशेने सरकवतात.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

रेस्क्यू ऑपरेशन

वृद्धा त्या पाइपला धरून ठेवते. दोघे पोलिस कर्मचारी तिला धीर देतात. दूरवर शेतात काम करणाऱ्या महिलादेखील विहिरीजवळ येतात. पोलिस करंजीचे पोलिसपाटील व ग्रामस्थांना खाट व दोर आणण्यास सांगतात. ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केलेले रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होते. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचल्याने गोदाकाठ परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, सायखेड्याचे पोलिस निरीक्षक आनंद आडसूळ यांनी या दोघाही कर्मचाऱ्यांचे बक्षीस देऊन अभिनंदन केले. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सायखेडा पोलिस ठाण्याचे कर्मचारी मला देवदूतासारखेच भेटले. त्यांनी माझा आवाज ऐकून मला विहिरीबाहेर काढण्यात खूप मोठी मदत केली. ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले. त्यांचे आभार. 
-सीताबाई निंबाळकर, सायखेडा  

एक वृद्धा पाण्यात जीव वाचविण्यासाठी धडपडत असते. तत्काळ ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिस कर्मचारी त्या वृद्धेचे प्राण वाचवतात.