पतीने घराबाहेर काढलेल्या महिलेला "ज्याने आश्रय दिला..त्यानेच केला धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 एप्रिल 2020

संशयीताचा कौटुंबिक वाद सुरू असून तो एकटाच राहतो. काही दिवसांपूर्वी पतीने घराबाहेर काढलेल्या 25 वर्षीय विवाहीतेशी त्याची भेट झाली. मखमलाबाद शिवार आश्रय देण्याच्या बहाण्याने महिलेला घरात घेतले, आणि तिला सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. परंतु याचाच फायदा घेत संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत धक्कादायक प्रकार केला.

नाशिक : मखमलाबाद शिवार आश्रय देण्याच्या बहाण्याने महिलेला घरात घेतले, आणि तिला सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. परंतु याचाच फायदा घेत संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत धक्कादायक प्रकार केला.

असा घडला प्रकार..

पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयीताचा कौटुंबिक वाद सुरू असून तो एकटाच राहतो. काही दिवसांपूर्वी पतीने घराबाहेर काढलेल्या 25 वर्षीय विवाहीतेशी त्याची भेट झाली. यावेळी संशयीताने महिलेस आश्रय देण्याचा बहाणा करीत महिलेस आपल्या घरात घेतले. याकाळात त्याने अनेक वेळा महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परंतू महिलेने टाळाटाळ करीत तुम्ही माझ्या वडिलांसमान असल्याचे सांगून वेळ मारून नेली. परंतू गेल्या मंगळवारी (ता. 31) संशयीताने महिलेच्या रूममध्ये जावून पुन्हा अंगलट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विवाहीतेने नकार देताच संशयीताने जातीवाचक शिवीगाळ करून तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून न्यायालयाने संशयीतास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

संशयीताला पोलिसांनी अटक केली

मखमलाबाद शिवार आश्रय देण्याच्या बहाण्याने घरात घेतलेल्या महिलेचा विनयभंग करीत एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. शरीर सुखाची मागणी केली असता, पीडितेने नकार दिल्याने संशयीताने जातीवाचक शिवीगाळ करीत महिलेस घराबाहेर काढले दिले. याप्रकरणी प्रशांत दायमा (45, रा. शितलामाता मंदिराजवळ, मखमलाबाद रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspected arrested for woman molestation case nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: